शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीच्या ७२ तिकीट मशीन्सला दुरुस्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

गोंदिया : एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून त्याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळाला भोगावा लागत ...

गोंदिया : एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून त्याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळाला भोगावा लागत आहे. २ महिने लालपरी रस्त्यावर धावली नसल्याने महामंडळास चांगलाच तोटा सहन करावा लागत असतानाच त्यात अधिकची भर म्हणजे, लालपरीतील तिकीट कापण्यासाठी वापरल्या जात असलेल्या तिकीट मशीन्सही नादुरुस्त झाल्या असून आता त्यांच्या दुरस्तीची गरज आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील गोंदिया आगारातील ५७ तर तिरोडा आगारातील १५ मशीन्स सध्या दुरुस्तीला पाठविण्यात आल्या आहेत; मात्र त्यानंतरही मशीन्सची जुळ‌वाजुळव करून धावणाऱ्या एसटीमध्ये मशीनद्वारेच तिकीट कापले जात आहेत.

---------------------------

जिल्ह्यातील एकूण एसटी बस - १२५

सध्या सुरू असलेल्या बस - १११

तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन - २०९

सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन - ७२

२) आगार इलेक्ट्रॉनिक मशीन बिघाड ट्रेचा वापर

अ गोंदिया १३७ ५७ ००

ब तिरोडा ७२ १५ ००

----------------------------------------------

दुष्काळात तेरावा...

मागील वर्षी कोरोनामुळे सुमारे अडीच महिने महामंडळाच्या फेऱ्या बंद होत्या. त्यामुळे महामंडळाला चांगलाच फटका बसला. त्यानंतर गाडी रूळावर येत असतानाच एप्रिल महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन झाले व एसटी बंद पडली होती. जून महिन्यापासून जेमतेम फेऱ्या सुरू असून मोजकेच उत्पन्न होत आहे. परिणामी आगारांना सुमारे ३.५० कोटींचे नुकसान झाले आहे. आजही फेऱ्यांना प्रतिसाद नसल्याने डिझेल निघणार एवढ्यावरच एसटी धावत आहे.

----------------------------

वाहकांची पुन्हा आकड्यांची जळवाजुळव

पूर्वी एसटीमध्ये कागदी तिकीट कापले जात होत्या व फेरी परतून आल्यावर वाहकाला विकलेल्या तिकिटांचा हिशोब करून पैसे आगारात जमा करावे लागत होते. त्यानंतर आता मशीनव्दारे तिकीट दिले जात असून यामध्ये एका क्लीकवर संपूर्ण हिशोब येत असल्याने वाहकांची सोय झाली आहे. काही ठिकाणी मशीन्स नादुरुस्त असल्याने तिकीट ट्रेचा वापर केला जात आहे. यामुळे वाहकांना हिशोबाची भानगड करावी लागत आहे. मात्र जिल्ह्यात मशीनद्वारेच तिकिटे दिली असल्याने वाहकांची ही डोकेदुखी वाचली आहे.

--------------------------

नुकसानीतही कर्मचाऱ्यांचा पगार वेळेतच

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाला झालेल्या नुकसानीने महामंडळाला नुकसानीच्या खाईत लोटले होते. त्यानंतर परिस्थिती सुधारत असताना दुसऱ्या लॉकडाऊनने कंबरडेच मोडून टाकले आहे. महामंडळाला आता अन्य उपक्रमांतून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची गरज भासत आहे. असे असतानाही कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत केला जात आहे.

----------------------------------------

जिल्ह्यातील काही तिकीट मशीन्स नादुरुस्त झाल्याने त्यांना दुरुस्तीसाठी भंडारा येथे पाठविले आहे; मात्र जिल्ह्यातील मशीन्सची जुळ‌वाजुळव करून काम सुरूच आहे. यामुळे ट्रेचा वापर करण्याची गरज नाही.

उमेश उईके

वाहतूक निरीक्षक, गोंदिया आगार