शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

तलावातील पवनकांदे परराज्यात

By admin | Updated: May 4, 2015 01:45 IST

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे.

संतोष बुकावन  अर्जुनी मोरगावनवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावातील पवनकांदे विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू आहे. या पवनकांद्यांना शहरात प्रचंड मागणी असून याची परराज्यात विक्री केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.प्राप्त माहितीनुसार, पवनकांदा ही वनस्पती नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या तलावात मुबलक प्रमाणात आहे. ही वनस्पती राज्यात अत्यंत कमी तलावात दिसून येते. पवनकांदा हे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या वनस्पतीच्या आकर्षणामुळे दरवर्षी या तलावात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येत असतात. शिवाय वनस्पतीच्या झाडाखाली सावली राहात असल्याने पक्षी उन्हाच्या कडाक्यातून बचावासाठी आश्रय घेतात. पूर्वी या तलावातील पवनकांदे व खस गवताचा लिलाव शासनातर्फे केला जात होता. मात्र पक्ष्यांचे खाद्य कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे ५ सप्टेंबर १९८५ रोजी पवनकांदे व खस गवताच्या विक्रीचे लिलाव बंद केले. लिलाव बंद होताच तलाव हे मोकळे रान झाले. यावर नियंत्रण राखण्यात प्रशासनाला अपयश आले. तलावाशेजारी असलेल्या गावातील लोकांना हा अवैध असलेला उद्योग मिळाला. अनेक गावातील लोकांनी या उद्योगाला उदरनिर्वाहाचे साधन बनविले. उन्हाळ्यात तलावाच्या पाण्याची पातळी कमी होते ही पातळी कमी होताच पाण्यात असलेली ही वनस्पती कोरड्या जमिनीवर असते. या वनस्पतीखाली असलेला कंद म्हणजेच पवनकांदा होय. यासाठी लोक वनस्पती तोडून कंद काढण्यासाठी खोदकाम करतात. यामुळे तलाव परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले दिसून येतात. खड्याच्या काठावरची माती तशीच पडून असते. पावसाळ्यात जंगलातून तलावाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तलावात मातीचा थर वाढत जातो. वारंवार दरवर्षी होणाऱ्या या पद्धतीमुळे तलाव आणखीच बुजला आहे. तलाव बुजल्याने येथील पाण्याचा संचय कमी झाला आहे. या तलावाचे पाच गावांना सिंचनासाठी पाणी मिळते. तलाव बुजत चालल्याने सिंचनक्षमतेवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. अशा प्रकारामुळे वनस्पती नष्ट होत आहे. त्यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांचे आवागमन कमी झाले आहे. वन्यजीव विभागाचे दुर्लक्ष असल्याने पवनकांदे खोदकामाचे निमित्त सधून पक्ष्यांची शिकार सुद्धा केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.येलोडी, जांभळी, रामपुरी, रांजीटोला तसेच तलावाच्या शेजारी असलेल्या गावातील सुमारे ५०० ते ६०० लोकं दररोज पवनकांद्याच्या खोदकामात गुंतलेले असतात. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हाच उद्योग सुरू असतो. कुटुंबातील मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सारी मंडळी या व्यवसायात रममाण असते. प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे ७०० ते ८०० रुपये कमावतो. यामुळेच परिसरात रोजगार हमी योजना, घरकुल योजना व शेती कामासाठी मजूरवर्ग सापडत नाही.काही कुटुंबातील लोक स्वत:च हा उद्योग करतात तर काही लोक गुत्तेदार बनली आहेत. गुत्तेदार लोक इतरांकडून कमी भावाने हे पवनकांदे खरेदी करतात. त्यांची साठवणूक करुन हा माल चारचाकी वाहनातून पुढे पाठवतात. काही लोक स्वत:च आजूबाजूच्या परिसरात जाऊन स्वत: विक्री करतात. काही गुत्तेदार हे रात्री स्वत:च्या दुचाकीने देवरी येथे जावून विक्री करतात. धाबेपवनीनंतर बोदराई फाटा आहे. या फाट्याजवळून एक कालवा जातो. कालव्याजवळून जाणाऱ्या रस्त्याने ही चोरटी वाहतूक केली जाते. हा रस्ता पुढे धाबेपवनी-चिचगड रस्त्याला मिळतो. याच मार्गाने देवरीकडे प्रयाण केले जाते. पवन कांद्यांची भाजी तयार केली जाते. विशेषत: सिंधी बांधव भाजीसाठी पवनकांद्याची मागणी करतात. स्थानिक लोकं देवरीपर्यंत हा माल सोडून देतात. देवरीत व्यापारी बसलेले असतात हे व्यापारी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, भिलाई, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वडसा येथील बाजारपेठेत हा पवनकांदा पाठवितात. त्याठिकाणी या कांद्याला ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. या प्रकारावर प्रतिबंध घालणे काळाची गरज आहे.