शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

श्रमदानाचे प्रतीक श्री अर्धनारेश्वरालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 01:38 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कर्मयोगी समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्याबद्दल विशेष माहिती नसतानासुद्धा ....

नयनरम्य परिसर : हलबीटोला-सालेकसा येथील उदयोन्मुख पर्यटन स्थळसागर काटेखाये साखरीटोलाराष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कर्मयोगी समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्याबद्दल विशेष माहिती नसतानासुद्धा त्यांच्या श्रमदानाच्या संकल्पनेशी निगडित विचारांनी प्रेरित होऊन सालेकसासारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या परिसरातील १५ नवयुवकांनी एकत्र येऊन एक नवीन ओळख हलबीटोला गावाला मिळवून दिली. या १५ नवयुवकांनी सामाजिक भूमिकेतून गेल्या १० वर्षांपासून हलबीटोला येथे रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत श्रमदान करून पर्यटन स्थळ निर्माण केले. त्यांच्या या कार्यामुळे २ नोव्हेंबर २०१२ ला ‘क’ श्रेणीचे पर्यटन स्थळ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केले.पहाडीवर असलेल्या दगडधोड्यांचे रूपांतर नयनरम्य भागात करून नवयुवकांनी आपल्या श्रमदानाने नंदनवन फुलविले. त्यामुळे या पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकाला शांती, समाधान मिळते. त्यांच्या या श्रमदानाच्या कार्याची चर्चा गोंदिया जिल्ह्याच्या चर्चेचा विषय आहे. सगळीकडे स्वार्थी भावनेने वागणारे लोक असताना लोकांकडून वर्गणी न घेता सभागृहाचे काम नवयुवकांनी केले. पाच हजार व्यक्ती भोजन करू शकतील इतक्या भांड्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे. सदर सभागृह सामाजिक, शासकीय उपक्रमाकरिता नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येते. वर्षभर नवयुवकांच्या वतीने विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून सामाजिक जनजागृती करण्याचे कामही केल्या जाते. या नवयुवकांनी श्री अर्धनारेश्वरालय नवयुवक गण सेवा मंदिर ट्रस्ट तयार केले असून या ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेंडे हे शेतकरी असून ते अंडे विक्रीचे काम करतात. उपाध्यक्ष गोविंदराव वरखडे हे विद्युत विभागात चौकीदार आहेत. सचिव बाजीराव तरोणे हे नित्यनिधी एजंटचे काम करतात. सहसचिव पवन पटले हे तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात काम करतात. कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद शाहू यांचे स्टँप विक्रीचे काम आहे. बाकी सदस्यांमध्ये विद्यार्थी पात्र लोको पायलट, शिवणकाम करणारे भरत शाहू, रोजंदार रमेश फरकुंडे, दुकानदार राजेंद्र बिसेन, वाहनचालक रमेश कापसे, शिक्षक कोमल टेंभरे, संगणक संचालक श्रीनुवई, चेतन बिसेन, संतोष कापसे असा या नवयुकांचा रोजगार आहे. दिवसभर आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी काम करायचे आणि रात्री ८ वाजता श्रमदानासाठी मंदिरात यायचे, हा नित्यक्रम मागील १० वर्षांपासून सुरू आहे. नवयुवकांच्या कार्याची दखल घेऊन पर्यटन तीर्थक्षेत्र निधी अंतर्गत १५ लाखांचे सभागृह व १५ लाखाच्या सिमेंट रस्त्यासाठी शासनाने निधी दिला व नवयुवकांनी काम पूर्ण केले. तसेच वेळोवेळी आमदार, खासदार निधी तसेच शासकीय निधीतून चावडी, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश झाडे, पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या हस्ते सालेकसा, आमगाव, गोरेगाव तालुक्यांतील ६३ गावांच्या तंटामुक्त समित्यांना धनादेश वितरित करण्यात आले होते. बालरोग, स्त्रीरोग याबाबत आरोग्य शिबिर घेऊन ९०० रूग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात आले. या ठिकाणी विविध शासकीय उपक्रमांतर्गत बैठका, सभा, प्रशिक्षण, प्रबोधन कार्यक्रम घेतले जातात. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने १ हजार ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच गणेश उत्सव, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, सामूहिक तुळशी विवाहाचे आयोजन येथे करण्यात येते.स्त्री-पुरूष समानतेचे प्रतीक म्हणून अर्धनारेश्वरालय या शिल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळेच अर्धनारेश्वरालय अशी ओळख निर्माण झाली. गोलाकार शिवपिंडाची निर्मिती करून त्यावर अर्धनारेश्वरालयाची प्रतिमा स्थापन करण्यात आली. डाव्या बाजूला कार्तिकेय व उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती त्याच्या वाहनासोबत उभी आहे. शंकराचे वाहन नंदीबैल तर पार्वतीचे वाहन सिंह हे त्या बाजूला आहेत. ऊन, वारा, पावसात हे शिल्प नेहमीच उघड्यावर बनविण्यात आलेले आहेत. सदर शिल्पकला बघून दिवसेंदिवस पर्यटक आकर्षिले जातात. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. दूरवरून विद्यार्थ्यांच्या सहली अर्धनारेश्वरालयात येतात. तसेच नवगणांच्या कार्याची दखल घेऊन भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सचिव जी.के. दास यांनी श्रमदानाची प्रशंसा करणारे पत्र ९ जून २०१० रोजी पाठविले होते. तसेच माजी केंद्रीय उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, मुंबईचे तत्कालीन उपायुक्त गो.रा. खैरनार यांनी सदर स्थळाला भेट देऊन प्रशंसा केली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. येथील काम बघून परिसरातील महिलांनीदेखील सहकार्य करण्याचे ठरविले व १६ सदस्यांची समिती बनविण्यात आली आहे. त्यामुळे नवगणांच्या सोबतीला आता महिलासुद्धा श्रमदानाचे काम करून महिला जागृतीचे कार्य करीत आहेत. ही महिला समिती परिसरात स्वच्छता राखणे, विविध कार्यक्रमांना सहकार्य करणे, उपक्रम राबविणे यासारखे कार्य करीत आहे. मंदिरात रोज सायंकाळी शंकराची महाआरती केली जाते. या नवगणांच्या श्रमदानाने जिल्ह्यातील लोकांना एक नवी प्रेरणा मिळाली आहे. ‘इच्छा तिथे मार्ग व प्रयत्न तिथे यश’ ही म्हण या नवयुवकांनी परिसरात नंदनवन फूलवून सिद्ध केली आहे. एकदा तरी व्यक्तीने अर्धनारेश्वरालय बघावे, असे नयनरम्य परिसर पिकनिककरिता लोकांना उपलब्ध झालेले आहे.