शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात कोमलप्रसाद न्यायापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:17 IST

तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील भडंगा येथील शेतकरी कोमलप्रसाद कटरे यांनी शासन दरबारी आपल्या चार मागण्यांना घेऊन २५ जानेवारीपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तीन दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्र्याच्या कार्यक्षेत्रातच कोमलप्रसाद न्यायापासून वंचित असल्याचे चित्र आहे.कोमलप्रसाद कटरे यांनी चार मागण्यांना घेवून उपोषण सुरू केले असून त्यात सन २०१२-१३ मध्ये न्याय देण्यास प्रशासनाने विलंब केल्यामुळे (पुंजण्याची नासधुस झाल्यामुळे) ते चुरणी करु शकले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, राजस्व विभागाच्या चुकीमुळे रेकार्ड दुरुस्तीला पाच वर्षे लावल्यामुळे सतत पाच वर्षे गट न.५५२ ची शेती आरजी १.०२ हे.आर. शेती पडीक राहिल्यामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. रेकार्ड दुरुस्तीला चार वर्षे विलंब लावणाऱ्या अधिकाºयावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, पाच वर्षे धावपळ व मानसिक त्रासासाठी आलेला खर्च देण्यात यावा. या चार मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु केले आहे. कटरे यांनी गेल्या सहा वर्षात पाच आमरण उपोषणे, एकदा पाणी टॉकीवर विरुगिरी केली आहे. आता पुन्हा आमरण उपोषणावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. कटरे यांनी प्रथम शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीला घेऊन उपोषण केले होते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने कोमलप्रसादला न्याय देत रस्ता तयार करून दिला. शेतालगतच्या ०.१४ हे.आर. ह्या विवादित जागेवरुन रस्ता मोकळा झाला. पण या प्रक्रियेसाठी प्रशासनाने चार ते पाच वर्षे लावले. त्यामुळे कोमलप्रसादचे संपूर्ण आयुष्य उध्ववस्त झाले. प्रशासनाचे उंबरठे झिजवित वेळ खर्ची झाला, मानसिक त्रास झाला. त्याची भरपाई मिळाली पाहिजे, आणि ज्या अधिकाºयामुळे हा सर्व प्रकार घडला त्या अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी कोमलप्रसादची मागणी आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले