शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची जाण असायला हवी

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले

गोंदिया : भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले तर त्या व्यक्तीवर अन्याय होतो. हा अन्याय होऊ नये, आपले अधिकार ठिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाण असायला हवी. ज्यामुळे अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागता येते व न्याय मिळतो, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांनी व्यक्त केले. रविवारी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त डोंगरगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रापंचायत डोंगरगाव येथे ग्राम विधी व दक्षता केंद्राच्या उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया, ग्रामपंचायत डोंगरगाव, म.गां. तंमुस डोंगरगाव, जिल्हा वकील संघ गोंदिया व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती कार्यक्रम, पंचायत समिती, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर रोजी महिलांकरिता व गावातील इतर नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव येथे ग्राम विधी दक्षता व सहायता केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची औपचारिक सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन तसेच विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनतेसाठी योजनांबद्दलची माहिती निखिल मेहता, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे व वरिष्ठ न्यायाधीश यांनी दिली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, गरीब व गरजू पात्र व्यक्तींना मोफत वकील पुरविणे, लोक अदालतीचे आयोजन करणे, मध्यस्थी योजना राबविणे व वरिष्ठांकडून वेळोवेळी निर्देश प्राप्त झाल्याप्रमाणे योजना राबविणे इत्यादी कार्य करण्यात येतात.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या ठिकाणी ग्राम विधी दक्षता व सहाय केंंद्र, पॅरा लिगल व्हालंटीयर्स योजना बचपन बचाव आंदोलनासंदर्भात १८ वर्षाखालील हरविलेले बालक व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरिता व त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्याकरिता, अत्याचार पीडित व्यक्तीस कलम ३५७ ए नुसार नुकसानभरपाई मिळवून देणे इत्यादी योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकारणांमार्फत राबविल्या जातात अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही व्यक्तिला कायदेविषयक अडचणी येत असतील तर त्यांनी नि:संकोचपणे जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी पोलीस नागरिक समन्वय पोलीस मित्र योजना याबाबत उपस्थित महिला व नागरिकांना माहिती दिली. महिलांचे संरक्षणविषयक कायदे याबाबतची माहिती न्यायाधिश एस.पी. सदाफळे यांनी दिली. कार्यक्रमात सरपंच नरेंद्र टेंभरे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भेदीराम डोंगरे, पुरणसिंह चौधरी, अ‍ॅड.बी.जी लिल्हारे, अ‍ॅड.एच.गौतम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान पंचायत समिती, गोेंदियाचे तालुका समन्वयक पी.टी. बिसेन, प्रशिक्षक मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. संयोजक रामकिशोर नागवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी.टी. वैद्य, महेंद्र पटेले, शिवदास थोरात, आर्यचंद्र गणविर, गुरुदयाल जैतवार, अशोक लिल्हारे, हेमराज पटले, तसेच ग्रामपंचायतचे व तंटामुक्त गाव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)