शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:51 IST

आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देशासनाने दिले सर्वेक्षणाचे निर्देश : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. कृषी विभागाने सुध्दा २० हजार हेक्टरमधील धान पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे म्हटले आहे. परिणामी जिल्ह्यातील धानपिक संकटात आल्याचे चित्र आहे.यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. पावसाचा खंड आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा, खोडकीडा या कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीडरोगांमुळे शेतकºयांना हाती आलेले पिक गमविण्याची वेळ आली आहे. कीडरोग नियंत्रणासाठी शेतकरी महागडी कीटकनाशके खरेदी करुन फवारणी करित आहे. मात्र कीडरोगासाठी पोषक वातावरण असल्याने फवारणीचा कसालाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी या तालुक्यातील धानपिकांवर कीडरोगांचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याची माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी कीडरोगांमुळे शेतातील पूर्ण पिक फस्त झाल्याने देवलगाव येथील दोन शेतकºयांनी त्रस्त होवून साडेचार एकारातील धानपिक जाळून टाकले. आधीच कमी पावसामुळे धानाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच आता कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही, अशी चिंता शेतकºयांना सतावित आहे.जिल्ह्यात १ लाख ८५ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने आधीच ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. त्यातच आता धानाचे पिक शेतकºयांच्या हाती येण्याची स्थिती असताना २० हजार हेक्टरवरील धानपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांवर संकट ओढवले आहे. कीडरोग आणि वादळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.तातडीने पंचनामे कराजिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत धानपिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश बुधवारी (दि.२५) जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या दरम्यान कीडरोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचीे माहिती आहे.