शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

खाकी वर्दीतील ज्ञानपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:32 IST

हजारपेक्षाही कमी लोकवस्तीचे गाव. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी बिरुदावली मिळालेले भरनोली हे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. गाव अगदी दारिद्र्यात खितपत पडलेले. गावात संपूर्णत: अशिक्षितपणा पण पूर्व विदर्भाच्या कुठल्याही ग्रामीण भागाला लाजवेल अशी परिस्थिती या गावची आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मदत । आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागात स्पर्धा परीक्षेचे धडे

संतोष बुकावन / चरण चेटुले।लोकमत न्यूज नेटवर्कभरनोली (राजोली) : हजारपेक्षाही कमी लोकवस्तीचे गाव. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त अशी बिरुदावली मिळालेले भरनोली हे गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. गाव अगदी दारिद्र्यात खितपत पडलेले. गावात संपूर्णत: अशिक्षितपणा पण पूर्व विदर्भाच्या कुठल्याही ग्रामीण भागाला लाजवेल अशी परिस्थिती या गावची आहे. येथील विद्यार्थी अभ्यासिका वर्गातून धडे घेऊन कुणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तर कुणी इतर शासकीय विभागाची नोकरी पत्करलेली आहे. हे केवळ महाराष्ट्र पोलीस, स्थानिक ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या सहकार्याने शक्य झाले आहे.घनदाट कीर्र जंगलात भरनोली हे गाव वसलेले आहे. आदिवासी युवक-युवती हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहून त्यांनी शासकीय सेवा पत्करावी ही मूळ संकल्पना रुजवून तेथील सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र भरनोली येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक महेश ताराम यांनी २०१४ मध्ये संकल्प केला. ७ जुलै २०१४ रोजी देवरीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांचे हस्ते भरनोली येथील दीपस्तंभ सार्वजनिक वाचनालय तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करुन उद्घाटन करण्यात आले.सुरुवातीचे काळात या इमारतीचा वापर हा एसआरपीएफ कॅम्पद्वारे स्वयंपाक खोली म्हणून व्हायचा,परंतु तत्कालीन पोलीस अधिकारी व शिक्षकाने याठिकाणी आदिवासी विद्यार्थ्याकरीता युपीएससी, एमपीएससी व इतर स्पर्धात्मक परीक्षेचे केंद्र उघडल्यास आदिवासी विद्यार्थी प्रगती साधतील हे हेरले. त्या दिशेने त्यांनी या कार्याची मूहूर्तमेढ रोवली. त्यांनी या कामी स्थानिक ग्रा.पं.चे सहकार्य घेतले. जुनाट व पडक्या इमारतीची स्व:खर्चाने डागडूजी करुन त्यांनी हे केंद्र आदिवासी विद्यार्थ्यास उपलब्ध करुन दिले. सुरुवातीचे काळात अल्प प्रतिसाद होता मात्र हळूहळू विद्यार्थी संख्येत भर पडू लागली. आदिवासी विद्यार्थ्याचे आर्थिक परिस्थितीनुरुप शिक्षणाचे अल्प प्रमाण असायचे. पोलीस अथवा वनरक्षक यासारख्या शासकीय नोकरीचे ते स्वप्न बघायचे. मात्र या वाचनालयाचा जसजसा प्रचार प्रसार होऊ लागला. तसतशी गर्दी येथे वाढू लागली. संदीप भूमेश्वर ताराम हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा ज्यावेळी उत्तीर्ण झाले तेव्हापासून खºया अर्थाने स्थानिक आदिवासींना या ज्ञानपोईचे महत्त्व कळू लागले. आजतागायत या ज्ञानपोईतून तब्बल १६ विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. अगदी दहाव्या वर्गापासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे अभ्यास करतात. नव्हे तर सुट्टीच्या दिवशी अभ्यास करुन रात्री तिथेच मुक्कामाला असतात.सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, कुरखेडा तालुक्यापासूनचे विद्यार्थी भरनोली येथे भाड्याने खोली घेऊन या अभ्यासिकेचा लाभ घेतात, ही या वाचनालयाची खरी यशस्वीता आहे.येथे कुलर, पंखे बैठकीसाठी उत्तम फर्नीचर वाचनालयात स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके, संगणक व व्यायाम शाळा अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या वाचनालय व व्यायामशाळेचे सर्व व्यवस्थापन पोलीस विभाग करतो आहे.सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र भरनोली येथे बहुतांशी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा येथून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन नोकरीवर रुजू झालेले पोलीस अधिकारी येतात. हे अधिकारी आपल्या उच्च पदासाठीही परीक्षा देण्यासाठी स्वत:चा अभ्यासिकेत अभ्यास करुन या आदिवासी विद्यार्थ्यानाही मार्गदर्शन करतात.त्यामुळेच आजमितीस संदीप ताराम, हेमचंद्र लांजेवार, हेमंत देव्हारे, विकास कुळमेथे, जोगेश्वर दरवडे, प्रभा नेटी, गीतमाला गदवार, रेखा काटेंगे, तेजपवनी लांजेवार, प्रविण मेश्राम, सचिन पुस्तोडे, श्रीकांत झिंगरे हे विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत. या वाचनालयासाठी विठ्ठल व विश्वनात राईत यांनी ही जागा दान स्वरुपात दिली आहे.बौध्दीक विकासासोबतच शारीरिक विकासाचा समतोल राखण्यासाठी येथे व्यायामशाळा उभारण्यात आली असून त्याचाही लाभ येथील आदिवासी युवक-युवतींना मिळत आहे. जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत असे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा देत वर्षभर येथे सामान्य ज्ञान व एमपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करतात.आणखी सुसज्ज वाचनालय होणारआदिवासी युवक-युवतींनी शासकीय सेवेत येण्याच्या दृष्टीने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. नक्षलवाद कमी व्हावा व लोकांच्या विचारसरणीत परिवर्तन होणे आवश्यक आहे. येत्या सहा महिन्यात सुसज्ज वाचनालय येथे दिसेल. संगणक, प्रोजेक्टर, प्रिंटर, कुलर, पंखे, फर्निचर व पुस्तकांचा साठा या सुविधा उपलब्ध होणार आहेत. अभ्यास कसा करायचा, स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी करायची व झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करुन विद्यार्थ्याचा सराव येथे घेतला जातो.इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्याना गत आठवड्यात ३० विद्यार्थ्याना बाहेरच्या जगताशी संपर्क म्हणून बिरसी विमानतळ व इटियाडोह धरणाच्या परिसर अभ्यासाची माहिती व्हावी म्हणून दोन दिवस मुक्कामाने आम्ही घेऊन गेलो. त्यांना शस्त्र व संगणकाचे ज्ञान प्राप्त करुन दिले. यात शिवरामटोला, बल्लीटोला, राजोली, भरनोली, खडकी, तिरखुडी येथील विद्यार्थ्याचा समावेश होता.आम्ही अभ्यासिकेतील विद्यार्थ्याना सर्वतोपरी सहकार्य करतो अशी माहिती भरनोलीचे पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांनी लोकमतशी बोलतांना दिली.मी येथेच घडलो२०१३-१४ चे काळात चिट्टे, हत्तीमारे व चौधरी या पोलीस अधिकाऱ्यांनी पडक्या इमारतीत लोकवर्गणी व स्वत: मदत करुन हे वाचनालय उभारले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत जिल्हाधिकाºयांकडून ५ लाख रुपयाचा निधी मंजूर केला. या वाचालयात ग्रंथ, स्पर्धात्मक, परीक्षेची अद्यावत पुस्तके, व फर्निचर उपलब्ध करुन देण्यात आले. सुरुवातीच्या काळात ३ ते ४ विद्यार्थी, नोकरीवर लागायचे आता हे प्रमाण वाढले आहे. मी शिक्षक होतो.सुटीच्या काळात तिथे राहून अभ्यास करायचा, मुक्कामी राहायचा, त्यामुळे अभ्यास परिपूर्ण व्हायचा मी तिथेच घडलो. क्लासेस सुध्दा घेतले अशी माहिती भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी दिली.

टॅग्स :Policeपोलिस