शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाने न खचता सकारात्मक ध्येय ठेवा

By admin | Updated: January 17, 2017 00:57 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते.

अतुल साळुंके : राज्यव्यापी रासेयो शिबिराची सांगता बोंडगावदेवी : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना सुसंस्कारीत जीवन जगण्याचे सामर्थ्य येते. ग्रामीण जिवनाच्या सानिध्यातून स्नेहाचा झरा पाझरतो. समोर येणाऱ्या कठीण प्रसंगातील यशापयशची तमा बाळगू नये. पराभवाला न खचता सकारात्मक ध्येय ठेवून युवा वर्गाने बिनधास्त पुढे जावे असे मार्मिक प्रतिपादन मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतूल साळुंके यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एस.एस.जे.महाविद्यालयाच्यावतीने येथईल समाज मंदिरा आयोजीत सात दिवसीय राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष लुणकरण चितलंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊसाहेब बिडवे, डॉ. भाऊ दायदार, सरंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जिल्हा परिषद सदस्य कमल पाऊलझगडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीदास बोरकर, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर, तत्कालीन प्राचार्य वसंत पाटणकर, डॉ. वासुदेव भांडारकर, बद्रीप्रसाद जायस्वाल उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. साळुंके यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जिवनासोबत प्रत्यक्षात समरस होण्याची संधी मिळते. प्रत्येकाने आपल्या शांत स्वभावाने माणसे जोडण्याचे तंत्र अवगत करावे. समाजातील विधायक कार्य करण्यासाठी युवकांनी नि:संकोच पुढे यावे. कुटूंब व समाज एकत्र राहण्याची किमया अवगत केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. त्यामुळे उज्वल भविष्य समोर ठेवून युवकांनी मार्गक्रमण करावे. रासेयोच्या माध्यमातून उज्वल भविष्य घडविण्याची दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. बिडवे यांनी, पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून संवर्धनासाठी युवा वर्गाने पुढे यावे. तर दुधाळू जनावरांचे संगोपन करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले. डॉ.दायदार यांनी, रासेयो शिबिराच्या माध्यमातून गावात चैतन्याची लाट निर्माण होते.शिबिरार्थ्यांच्या श्रमशक्तीमधून गावाचा चेहरा-मोहरा बदलून कायापालट होण्यास मदत होते. गावातील विकास व स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रासेयोच्या माध्यमातून झाला आहे. आता या पुढे गाव प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सामुहितपणे ग्रामस्थांची असल्याचे मत व्यक्त केले. संचालन डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्तावीक शिबिर प्रमुख डॉ. राजेश चांडक यांनी मांडले. अहवाल वाचन अभिजीत कुंभार यांनी केले. तर आभार डॉ. शरद मेश्राम यांनी मानले. (वार्ताहर)