शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कौशिकच्या मारेकऱ्यांचा कोठडीत मुक्काम वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 05:00 IST

सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा न्यायालयाने वाढ केली आहे. त्या तिघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत पुन्हा न्यायालयाने वाढ केली आहे. त्या तिघांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली. आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली होती. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२) रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले होते. मागील तीन महिन्यापासून २ लाख २० हजार रूपये टप्याटप्याने आरोपी बनकरला देण्यात आले होते. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. या प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला नसल्याने न्यायालयाने त्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस