शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

केटीएस, बीजीडब्ल्यूतील परिचारिका वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:10 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यापासून थकले वेतन : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी त्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.केटीएस आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयात सध्या कार्यरत परिचारिकांची नियुक्ती ही रत्नागिरी, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, लातूर, अकोला तसेच इतर जिल्ह्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे.या परिचारिकांना जीएमसी वेतन पथक संबंधित बाबूकडून वेतन मंजूर करुन ते जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठविले जाते. मात्र कधी पीएनआर क्रमांक तर कधी कोषागार कार्यालयाकडून बिल न मिळाल्याचे कारण पुढे करुन वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून हाच प्रकार सुरू आहे.या दोन्ही रुग्णालयात कार्यरत ६० परिचारिकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वेतन न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा परिचारिकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.औषधे व यंत्रसामुग्रीची समस्या कायमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध वितरण विभागात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचा तुटवडा आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणारी सामुग्री, बीटी सेट, इंट्राकप, युरोबॅग, ग्लूकोजट्री आदी औषधी उपलब्ध नाही.तर ईसीजी, विष तपासणी, डेंग्यू-मलेरिया, सीबीसी, सिकसेल, थैलसिमीया, विड्राल, एचआयव्ही, केवायएफ, फ्लूड एक्सपर्ट यासारख्या तपासणीसाठी आवश्यक केमिकल उपलब्ध नसल्याने या तपासण्या बंद आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन या तपासण्या करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.तज्ज्ञ डॉक्टरांचा अभावशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयुर्वेदिक, आर्थोपेडिक, जनरल फिजीशियन, नाक-कान-घसा तज्ज्ञ आणि दंतरोग तपासणी विभागात शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक विभागात ६ ते ७ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात २२आली आहे. मात्र तपासणीच्या वेळेस केवळ कनिष्ठ डॉक्टर उपलब्ध राहतात. त्यामुळे वरिष्ठ डॉक्टर नेमके जातात कुठे असा प्रश्न रुग्णांना पडतो.सुरक्षा रक्षकाची नियुक्ती नाहीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री लावण्यात आली आहे. तसेच या परिसरात वित्त आणि लेखा विभागाचे कार्यालय आहे. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांची यंत्र सामुग्री भगवान भरोसे आहे. विशेष म्हणजे या परिसरात अनेक वाहनांची सुध्दा चोरी झाली आहे. मात्र त्याची सुध्दा अद्याप दखल घेण्यात आली नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल