लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथे उपविभागीय पाटबंधारे विभाग व शाखा अभियंत्याची दोन कार्यालये अशी तीन कार्यालये आहेत. यात कार्यरत अधिकारी- कर्मचारी फक्त दोन तास सेवा देतात. उपविभागीय कार्यालय व दोन शाखा अभियंता कार्यालय या ठिकाणी आहे. अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकानुसार या कार्यालयांचा कारभार सुरू असल्याची तक्रार युवा कास्तकार संघटनेने केली आहे.तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात. दोन तास कार्यालयात राहून पगार मात्र पूर्ण महिन्याचा घेतात. असे उपविभागीय अभियंत्यांना केलेल्या तक् ारीत नमूद आहे.प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता १४ पैकी केवळ पाच कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. राजोली, भरनोली पासून, नवेगावबांध परिसरातील शेतकरीही दाखले घेण्यासाठी किंवा अन्य शेतीविषयक कामांसाठी या कार्यालयात येत असतात. मात्र कार्यालयात आल्यावर, कार्यालयातील शाखा अभियंतासह कर्मचारी शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडतच नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांसह पाटबंधारे कार्यालय वाऱ्यावर आहे. स्थानिक मुख्यालयी राहत असलेले कर्मचारी पूर्णवेळ या कार्यालयात दिसतात. या प्रकाराला अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याचे शेतकरी बोलत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून या प्रकारावर आळा घालून, पूर्ण वेळ कर्मचारी कार्यालयात कसे राहतील याकडे लक्ष देण्याची मागणी युवा कास्तकार संघटनेने केली आहे.कार्यालयात जवळपास २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामानिमित्त बाहेर जावे लागते.- समीर बंसोड, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध
फक्त दोनच तासांची ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST
तिन्ही कार्यालयात १४ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शाखा अभियंता सह पाच ते सहा कर्मचारी रेल्वेने गोंदियावरून येणे-जाणे करतात. १२.३० वाजता डेमो रेल्वे गाडीने कार्यालयात येतात व दोन तास कार्यालयीन कामकाज आटपून २ वाजताच्या डेमोने निघून जातात. या प्रकाराकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित गावातील शेतकऱ्यांना हात हलवत परत जावे लागते किंवा या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजताची आहे. परंतु हे येणे-जाणे करणारे कर्मचारी रोजच दोन तास कार्यालयात कसेबसे राहतात.
फक्त दोनच तासांची ड्युटी
ठळक मुद्देपाटबंधारे उपविभाग व शाखा अभियंता कार्यालय वाऱ्यावर : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कामकाज