शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून तुटपुंजे मानधन देऊन थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. मात्र यात विशेष शाळेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधनाच्या गोंडस नावाखाली अतिशय तुटपुंजे मानधन देवून त्यांची थट्टा केली जात आहे. त्यामुळे आपल्या ...

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांना निवेदन : बालकामगार प्रकल्प कर्मचारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. मात्र यात विशेष शाळेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधनाच्या गोंडस नावाखाली अतिशय तुटपुंजे मानधन देवून त्यांची थट्टा केली जात आहे. त्यामुळे आपल्या मागण्या सोडविण्यासाठी बालकामगार प्रकल्प कर्मचारी संघाने खा. प्रफुल्ल पटेल यांना निवेदन दिले.निवेदनानुसार, प्रकल्पांतर्गत विशेष शाळेत कार्यरत कर्मचारी स्वत: अर्धपोटी उपाशी राहून बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहेत. मात्र आज या कर्मचाऱ्यांचाच जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार लाभ मिळावा म्हणून प्रकल्पातील विद्यार्थ्यांना जवळील शासनमान्य शाळेत दाखल करण्यात येते. दिवसेंदिवस जागृती निर्माण होत असल्याने बहुतांश बालकामगार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले. त्यामुळे बालकामगारांची संख्या कमी होत चालली. मात्र बहुतांश प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या शाळा बंद पडल्याने तेथील कार्यरत कर्मचाºयांना पुन्हा बेरोजगार व्हावे लागले. त्यांनी प्रकल्पात आपल्या जीवनातील महत्वाचे वर्ष सेवा देण्यात घालविले. आता इतरत्र रोजगार मिळणे कठिण असल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची पाळी आली आहे.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने केंद्र शासनास निवेदने पाठवून मागणी करण्यात आली. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या उच्चस्तरीय अधिकाºयांनी बालकामगार प्रकल्पातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दखल घेत राज्यशासनास सदर कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आदेश पत्रान्वये दिले. मात्र ‘समान काम-समान वेतन’ हे धोरण पुरस्कृत करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात शासनाकडून दुजाभाव होत आहे. केवळ चार वर्षे कार्यान्वित असलेल्या वस्ती शाळांतील शिक्षकांना निमशिक्षकांचा दर्जा देवून शासकीय सेवेत वयाची व शिक्षणाची अट शिथिल करून सामावून घेण्यात आले.पण बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा राज्य शासनाने कसलाही विचार केलेला नाही.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वस्ती शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर शासकीय सेवेत सामावून घ्यावे व त्यांना किमान वेतन लागू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा मागणीचे निवेदन कर्मचारी संघाच्यावतीने खासदार प्रफुल पटेल यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर खा.पटेल यांनी या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.निवेदन देताना राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प शाळा कर्मचारी संघाचे अध्यक्ष संदीप सोनेवाने, सचिव जितेंद्र भालाधरे, संतोष खेरडे, सुरेश गुर्वे, चेतनकुमार वघारे, अनिता पटले, श्रद्धा डोंगरे, गीता कनोजे, ज्योती रहांगडाले, श्रद्धा बन्सोड, करिष्मा मिश्रा, तिर्थरेखा चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेल