शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचा प्रवास झाला सुखाचा ! २३ रेल्वेगाड्या झाल्या स्पेशल काढून नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आता रेल्वेने विशेष गाड्यांचा दर्जा काढत या गाड्या नियमितपणे सुरू केल्या आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ५६ गाड्या धावत होत्या. यापैकी २३ गाड्यांचा विशेषचा दर्जा हटला असून या गाड्या आता नियमित झाल्या आहेत. तर गोंदिया-बालाघाट, गोंदिया-समनापूर, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारी या लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर रेल्वे नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत केवळ त्याच मोजक्या गाड्या सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दुप्पट तिकीट भाडे माेजावे लागत होते. तर लोकल आणि पँसेजर गाड्या बंद असल्याने सर्वसामान्य आणि गोरगरिबांची चांगलीच अडचण झाली होती. तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर आता रेल्वेने विशेष गाड्यांचा दर्जा काढत या गाड्या नियमितपणे सुरू केल्या आहेत. गोंदिया रेल्वे स्थानकावरून दररोज ५६ गाड्या धावत होत्या. यापैकी २३ गाड्यांचा विशेषचा दर्जा हटला असून या गाड्या आता नियमित झाल्या आहेत. तर गोंदिया-बालाघाट, गोंदिया-समनापूर, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारी या लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. नियमित झाल्या २३ रेल्वे गाड्या - हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. सध्या या रेल्वे स्थानकावर ५६ गाड्या धावत आहेत. यात विशेष गाड्याचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर आता यापैकी अर्ध्या गाड्या नियमित झाल्या असून पुढील आठवड्यात पूर्णच गाड्या पूर्ववत नियमित होणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुढील आठवड्यात होणार सर्वच गाड्या पूर्ववत- लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरून दीडशे गाड्या धावत होत्या. त्यानंतर आता ५६ विशेष गाड्या धावत आहे. या सर्व गाड्या आता नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत २३ गाड्या नियमित झाल्या असून उर्वरित सर्वच गाड्या पुढील आठवड्यापर्यंत नियमित होणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

पॅसेंजर गाड्या आल्या रुळावर गोंदिया-बालाघाट, गोंदिया-समनापूर, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-दुर्ग, गोंदिया-इतवारीगोंदिया-डोंगरगड

रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार आता विशेष गाड्यांना पूर्ववत नियमित करण्याचे काम सुरू आहे. नियमित गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देताना त्या गाड्यांच्या क्रमांकापुढे शून्य लावण्यात आला होता. आता तो शून्य काढून या गाड्यांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील चार-पाच दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.        -जनसंपर्क अधिकारी, रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे