शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम पोलिसांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला.  समाजासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मिळालेल्या ४६ वाहनांचे केले लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ­ राज्याच्या टोकावर असलेला गोंदिया जिल्हा विकासाच्या मार्गावर झपाट्याने चालत आहे. पोलिसांचे काम अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी अत्याधुनिक असलेल्या ६ स्काॅर्पिओ व ४० बोलेरो उपलब्ध करून दिल्या. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून जिल्हा पोलिसांना त्यांच्या कामासाठी ही वाहने मदत करतील. पोलीस समाजात समन्वय घडवून आणण्याचे काम करतात. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडच्या कामातही फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करताना अनेक पोलिसांचा मृत्यू झाला. तर अनेकांना कोविडचा त्रास सहन करावा लागला.  समाजासाठी आणि सुरक्षेसाठी पोलिसांचे महत्त्व अधिक असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. जिल्हा नियोजन व विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ४६ वाहनांच्या पोलीस मुख्यालयात (कारंजा) आयोजित लोकार्पण कार्यक्रमात रविवारी (दि. १८) ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आ. विनोद अग्रवाल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहेसराम कोरोटे, आ. अभिजित वंजारी, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन.डी. किरसान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, अमर वऱ्हाडे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपस्थित होते. लाल फीत कापून वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक पानसरे यांनी, आम्हाला कुठे क्राइम घडले याची माहिती मिळाली तर आम्ही ६ ते ७ मिनिटांत घटनास्थळावर पोहोचतो. परंतु ही अत्याधुनिक वाहने मिळाल्याने ५ मिनिटांच्या आत घटनास्थळावर आता पोहोचता येईल, असे सांगितले. संचालन रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे यांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्विनी कदम यांनी मानले. या वेळी सर्व आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल, गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तिराेडाचे नितीन यादव, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, ग्रामीणचे ठाणेदार विजय राणे, रावणवाडीचे उमेश पाटील, आमगावचे विलास नाळे, सालेकसाचे प्रमोद बघेले, नक्षलविरोधी अभियानाचे शरद पाटील, श्रीकांत हत्तीमारे उपस्थित होते. या वेळी  लिपिक बोपचे यांचा सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :Policeपोलिसprafull patelप्रफुल्ल पटेल