शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

झालियाच्या यशवंतची अपंगत्वावर मात

By admin | Updated: June 9, 2014 23:43 IST

तालुक्याच्या झालिया येथील रहिवासी यशवंत नत्थू वलथरे या युवकाने आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त कामे करुन सुदृढ युवकांनाही लाज यावी

विजय मानकर - सालेकसातालुक्याच्या झालिया येथील रहिवासी यशवंत नत्थू वलथरे या युवकाने आयुष्यभरासाठी वाट्याला आलेल्या अपंगत्वावर मात करीत इतर सामान्य माणसांपेक्षा जास्त कामे करुन सुदृढ युवकांनाही लाज यावी असा आदर्श निर्माण केला आहे. आईच्या दुर्लक्षितपणातून जेमतेम एक वर्षाचे वय असताना चुलीत हात घातल्याने त्याला उजव्या हाताचा पंजा गमवावा लागला. पण हाताचा पंजा नसल्याने रडत न बसता तो आज सर्वसामान्य मजुरांप्रमाणे मेहनतीची कामे करीत आहे.अतिशय गरीबीच्या परिस्थितीत वाढलेला यशवंत आपल्या पत्नी, मुलासह सुखाचा संसार करीत आहे. अपंग असूनही कोणत्याही कामात तो इतरांवर आ२िँं१्रूँं१त राहिला नाही. हे त्याच्या जीवनाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लोकमतशी बोलताना त्याने आपली जीवनकहानी सांगितली. त्याची कहाणी ऐकून नवल वाटल्याशिवाय राहात नाही. त्याचबरोबर मनातील संवेदना तीव्र झाल्याशिवाय राहात नाही. यशवंतराव वलथरे हा ढीवर समाजातील युवक आहे. या समाजातील महिला नेहमी पोहे, मुरमुरे घरी तयार करुन गावागावात विकण्याचे काम करतात. परंपरेनुसार यशवंतची आई कौतुका वलथरेसुद्धा आपला पारंपारिक व्यवसाय करणारी व श्रम करणारी महिला होती. परंतु तिच्या एका नजरचुकीने यशवंतला कायमचे अपंगत्व पत्करावे लागले. यशवंता एका वर्षाचा असताना एक दिवस तिने मुरमुरे फोडण्यासाठी चूल पेटवली व आपल्या कामात गुंतली. यशवंत खेळता-खेळता विस्तवात खेळायला गेला अन् आपला उजवा हात त्याने चुलीत टाकून दिला. यात त्याच्या हाताचा पंजा खूप जास्त भाजला. आईकडे यशवंतला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने आगीचा दाह कमी करण्यासाठी घरगुती उपचार केले. परंतु आगीत त्याचे सर्व बोटे जळून गेली व पंजा हाताला चिटकूनच राहिला. शेवटी योग्य उपचाराअभावी यशवंतचा उजवा हात कायमचा अपंग झाला व त्याला अपंगत्वाचा ठपका लागला. मात्र यशवंत जसजसा मोठा होत गेला तसतसा तो इतर मुलांसोबत कामे करण्याची सवय लावू लागला. वयात आल्यावर तो सामान्य माणसाप्रमाणे सर्व कामे करू लागला. त्याची काम करण्याची स्फुर्ती पाहून त्याचा लग्न जुळण्यातही अडचण आली नाही.  यशवंतने आपल्या पत्नीसोबत सुखी संसार सुरू केला. रोज मोलमजुरी करायचा व आपला उदरनिर्वाह करायचा, असा त्याचा नित्यक्रम झाला. यात त्याच्या पत्नीचेही पुरेपूर सहकार्य लाभले. यशवंतरावच्या आई-वडिलाची शेतजमीन नसल्यामुळे मोलमजुरी हा त्याचा उदरनिर्वाहाचा आधार असून त्याने दुसर्‍याच्या शेतात जावून नागर चालविणे, पर्‍हे काढणे, माती खणणे आदी कामे कुशलतेने करुन दाखविले. याच बरोबर सहकार्‍यांसोबत खेळताना क्रिकेट, कबड्डी, खो-खो व इतर खेळात जिद्दीने भाग घ्यायचा. क्रिकेटची बॅट फिरवित असताना इतर मुले त्याच्याकडे बघतच राहायचे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादलीचा दोर खेचत असताना लोक त्याच्याकडे आजही नवलाईने पाहात असतात. त्याने सांगितले की, शेतीच्या सर्व कामामध्ये गवत किंवा धानकापणीच्या कामात थोडीफार अडचण निर्माण होत असते. सध्या तो ट्रॅक्टरच्या हमाली कामावर जात असून त्यात तो सर्व कामे इतरांच्या बरोबरीत किंवा त्यापेक्षा जास्त करून दाखवतो. ट्रॅक्टरमध्ये विटा भरणे, खाली करणे, वाळू भरणे, उपसणे, माती खणणे, घमेल्यात भरणे इत्यादी सर्व कामे तो करीत असतो. काम व कमाई करणारे असूनसुद्धा यशवंतराव त्यांच्यावर आ२िँं१्रूँं१त न राहता तेवढय़ाच जोमाने काम करीत अर्थाजन करीत आहे.