शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीने कालवा फोडून वळविले जात आहे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.

ठळक मुद्देबबई येथील प्रकार : कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रब्बी आणि उन्हाळी धानासाठी सध्या कालव्याव्दारे पाणी सोडले जात आहे. याच अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले असून बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी जेसीबीव्दारे कालवा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. मात्र या प्रकाराकडे कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे पाणी सोडण्यात आले असून त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.मात्र कलपाथरी मुख्य कालव्या अंतर्गत शेती असणाऱ्या ग्राम बबई येथील २ शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी चक्क जेसीबीने कालवा फोडून कालव्यातील पाणी नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या २ शेतकऱ्यांनी कालव्याला जेसीबीव्दारे मोठी खांड पाडली आहे. हे सर्व करीत असताना संबंधित शेतकऱ्यांनी यासाठी कलपाथरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान प्रकारामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी याला विरोध केला. तसेच याची तक्रार सुध्दा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांचे पाण्याअभावी धोक्यात आल्याने शेतकºयांमध्ये अधिकाºयांच्या कर्तव्य तत्परतेप्रती संतापाचे वातावरण आहे.कलपाथरी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे तसेच नियमबाह्यपणे कालवा फोडणाऱ्या २ शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई