शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जातविरहित समाज देश विकासाला पोषक

By admin | Updated: April 20, 2016 02:01 IST

विकासाच्या वाटेवर देशाला मोठे करायचे असेल तर जातविरहित समाज घडविण्याची गरज आहे.

पालकमंत्री बडोले : प्रबोधन कार्यक्रमाचा समारोप सालेकसा : विकासाच्या वाटेवर देशाला मोठे करायचे असेल तर जातविरहित समाज घडविण्याची गरज आहे. आज आपल्या देशातील लोक समाजात जातीत विभागले असून जातीचे विभाजन समाजाला व देशाला नेहमी घातक ठरत राहील. परिणामी देशाची प्रगती बाधीत होत राहिल. खऱ्या अर्थाने देशाला आर्थिक, सामाजिक, समता, बंधुत्व आणून देशाला मोठे बनविण्यासाठी जातविहरीत समाज पोषक ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. येथे १७ एप्रिल रोजी चार दिवसीय प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय सभारंभात अध्यक्षीय भाषण देताना लोकांना संबोधित करीत होते.तालुक्यातील आमगावखुर्द येथील नागार्जुन बौद्ध विहार समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून आयोजीत प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.१७) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, पंचायत समिती माजी सभापती राकेश शर्मा, जिल्हा परिषद सभापती देवराज वडगाये, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा संयोजक प्यारेलाल जांभुळकर, प्रमोद संगीडवार, परसराम फुंडे, बाबुलाल उपराडे, संगीता शहारे, सुदेश जनबंधू, समितीचे अध्यक्ष खेमराज साखरे, सरपंच योगेश राऊत, राजेंद्र बडोले, विरेंद्र अंजनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, बाबासाहेबांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक चटके सहन केले. मोठा संघर्षमय सामाजिक लढा दिला. त्यातून त्यांनी येणाऱ्या पिढीसाठी अनेक विचारांना जन्म दिला. त्यांचे हे विचार पिढ्यानपिढ्या समाजासाठी उपयोगी पडत राहणार आहेत. म्हणून आज बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करुन सामाजिक क्रांती घडविण्याची गरज आहे. त्यातूनच समाज बलशाली होऊ शकतो असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी अनेक योजनांची माहिती देत येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभाग कोण-कोणते उपक्रम राबविणार याबद्दल सांगितले. दरम्यान आमदार पुराम व माजी मंत्री बहेकार यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात खेमराज साखरे यांनी तालुक्यातील अनुसूचित जातीसह इतर बाबतीत अनेक आवाहने काय आहेत याची जाणीव करुन दिली. संचालन कैलास गजभिये यांनी केले. आभार निर्दोष साखरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ललीता वैद्य, प्रतिभा साखरे, वर्षा मेश्राम, युवराज लोणारे, मनिषा साखरे, सुजीत बन्सोड, गुणीलाल राऊत, संतोष देऊळकर, अनिल तिरपुडे, माणिक डोंगरे, भीमराव भास्कर, शामराव टेंभुर्णीकर, सतिष करकाडे, शोभाराम शहारे, रेखा डोंगरे, वंदना अंबादे, जयकुमार राऊत, शुभम सहारे, अनिल सोनटक्के यांच्यासह तालुक्यातील इतर गावातील बौद्ध उपासक-उपासिकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)