शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

जब्बारखेड्यात जनजागरण मेळावा

By admin | Updated: January 24, 2016 01:47 IST

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत पोलीस स्टेशन नवेगावबांध व सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीच्या संयुक्तवतीने जब्बारखेडा येथे दोन दिवसीय भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला.

आरोग्य शिबिर : विविध योजनांची दिली माहिती नवेगावबांध : गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत पोलीस स्टेशन नवेगावबांध व सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीच्या संयुक्तवतीने जब्बारखेडा येथे दोन दिवसीय भव्य जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.२२) परिसरातील नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, डॉ. अशोक चौरसिया, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश येळणे, डॉ. गगण वर्मा, बालरोग तज्ज्ञ डॉ. ठकरानी व डॉ. अनुप अग्रवाल, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पीती बागडे, डॉ. सुषमा बुद्धे, नेत्रचिकित्सक डॉ. निकिता सोयाम, सरपंच संजय खरवडे, सामाजिक कार्यकर्ता नवल चांडक, विजय डोये, ठाणेदार सुनील पाटील, डॉ. सुषमा डोये, डॉ. कुलदिप बघेल, डॉ. भूषण मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.त्याचबरोबर महसूल विभागातर्फे विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. महिला व पुरुष गटांकरिता कबड्डी सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार बोंबार्डे, नायब तहसीलदार एन.एस. गावड आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिरात विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. कृषीविषयक मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी केले. पंचायत समितीतर्फे जाधव यांनी मार्गदर्शन केले. भूमि अभिलेख विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, वनविभागातर्फेदेखील मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार सुनील पाटील यांनी मांडले. संचालन पो. उपनिरीक्षक पाटील यांनी केले. आभार डॉ.आनंद कुकडे यांनी मानले. शनिवारी (दि.२३) विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)