गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी ‘जय माता दी’चा गजर करीत नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. सकाळपासून ठिकठिकाणच्या सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे वाजतगाजत मिरवणुकीने आगमन होत होते. मार्गात भाविक महिला देवी दुर्गेची ओवाळणी करून स्वागत करतानाचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जात आहेत.
जय माता दी...
By admin | Updated: October 14, 2015 02:25 IST