शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जागृत देवस्थान कोकणाई माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:30 IST

परिसरातील बोळदे-कवठा वनपरिक्षेत्रात कोकणाई मातेचे भव्य देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.अनेक ठिकाणाहून भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. यंदा मंदिराच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे.

ठळक मुद्देरौप्य महोत्सवी वर्ष : विविध कार्यक्रमांचे आयोजन, भाविकांची गर्दी

मुन्नाभाई नंदागवळी ।लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : परिसरातील बोळदे-कवठा वनपरिक्षेत्रात कोकणाई मातेचे भव्य देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.अनेक ठिकाणाहून भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. यंदा मंदिराच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. जागृत कोकणाई मातेचे देवस्थान उंचवट्यावर जंगलात आहे. ही जागृत मंदिर म्हणून प्रसिध्द आहे.जंगल परिसरात हे मंदिर आहे. मातेची मूर्ती ही खडकाच्या आतील भागात डोंगरावर आहे. मूर्तीच्या मागून पाण्याचा झरा दगडातून सतत वाहत असतो. कोकणाई मातेचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. या मंदिराला बराच इतिहास देखील आहे.डोंगराळ भागात १०९ वर्षापूर्वी एक बालिका नेहमी पूजा करीत असायची, हीच मुलगी पहाडावर घोड्यावरुन स्वारी करीत होती. तिच्या मूर्तीचे पूर्णाकृती पुतळे देखील पहाडीवर सापडले. तसेच या पहाडीवरील जुने अवशेष आजही जसेच्या तसेच ठेवण्यात आले आहेत.त्यानंतर एका चित्रकाराच्या मदतीने १९९४ मध्ये कोकणाई मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यंदा या देवस्थानच्या कार्यक्रमाला २५ वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त रौप्य महोत्सव साजरा केला जात आहे.कोकणाई मातेच्या मंदिरात जाण्यासाठी कवठा गावापासून रस्ता तयार करण्यात आला. तसेच भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे एका बोअरवेल, दोन सभामंडप सुध्दा भक्तांसाठी तयार करण्यात आले आहे.दर मंगळवारी व शनिवारी येथे पूजा होत असते. भजनांचा कार्यक्रम सुरु होतो. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवात या मंदिरात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात या मंदिराला मान्यता आहे. कोकणाई मातेच्या देवस्थानाच्या विकासासाठी अध्यक्ष छोटूलाल मारगाये,सचिव केशव किरसान, उपाध्यक्ष भिवा किरसान, ग्रा.पं.सदस्य धम्मदीप मेश्राम, ज्ञानू प्रधान आणि सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.मंदिराला क तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा मी अनेक वर्षापासून कोकणाई मातेच्या देवस्थानाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. आता रस्ता तयार करण्यासाठी वनविभागाकडे मी पाठपुरावा केला. त्यानंतर रस्ता तयार करण्यात आला. आता या मंदिराला लवकरच क तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल.- किशोर तरोणे, जि.प.सदस्य.