शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

तो मी नव्हेच अधिकाऱ्यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सीएमआर स्वीकृत केंद्रांवर तांदूळ घेणे सुरूच आहे. येथील नियुक्त गोदामपालांवर कारवाईची मागणी केली जात आहे.  अर्जुनी मोरगाव येथे धानाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शासनाच्या आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते. या हंगामात मार्केटिंग फेडरेशनकडे १० लक्ष २७ हजार ८८७ क्विंटल शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धानसाठा शिल्लक आहे. आदिवासी महामंडळाची आकडेवारी कळू शकली नाही.

संतोष बुकावनलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : धान भरडाईची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. राईस मिलर्स धान नियतानाशिवाय तांदूळ जमा करून स्वीकृती पावत्या घेत आहेत. यामुळे हंगामातील खरेदी झालेल्या धानापेक्षा जास्त क्विंटलच्या स्वीकृत पावत्या जमा होण्याची शक्यता आहे. पावत्यांच्या बदल्यात राईस मिलर्सना तेवढे धान उपलब्ध करून देण्याचे संकट प्रशासनासमोर उभे ठाकणार आहे. अधिकाऱ्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका आणि प्रशासनाची डोळेझाक या निमित्ताने समोर आली आहे.अजूनही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सीएमआर स्वीकृत केंद्रांवर तांदूळ घेणे सुरूच आहे. येथील नियुक्त गोदामपालांवर कारवाईची मागणी केली जात आहे.  अर्जुनी मोरगाव येथे धानाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शासनाच्या आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली जाते. या हंगामात मार्केटिंग फेडरेशनकडे १० लक्ष २७ हजार ८८७ क्विंटल शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धानसाठा शिल्लक आहे. आदिवासी महामंडळाची आकडेवारी कळू शकली नाही. या न एजन्सीमार्फत राईस मिलर्सला भरडाईसाठी नियतन दिले जाते. नियतन प्राप्तीनंतर राईस मिलर्स मोबदल्यात शासनाला तांदूळ देतात. भरडाईची मुदत ३० सप्टेंबरलाच संपली आहे. तरीदेखील अर्जुनी मोरगाव तालुक्यात तांदूळ घेण्याचा गोरखधंदा सुरूच आहे. सीएमआर स्वीकृती केंद्रावर राईस मिलर्सकडून अलॉटमेंट न पाहता तांदळाचे लॉट स्वीकारले जात आहेत. यात अधिकाऱ्यांचे हात चांगलेच ओले झाले आहेत. यासंदर्भात मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जाणीव आहे. संबंधित यंत्रणेला त्यांनी तसे आदेशही निर्गमित केले आहेत. या पत्रात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राईस मिलर्स धानाच्या नियतनाशिवाय स्वीकृती पावत्या तयार करून जमा करीत असल्याचे नमूद आहे. माहिती असूनही केवळ कागदी घोडे रंगविले जात आहेत. कारवाई मात्र काहीच नाही. बुधवारी  सदर प्रतिनिधीने किसन अग्रवाल यांनी किशोर शहारे यांचेकडून भाड्याने घेतलेल्या गोदामात भेट दिली असता गोदामातील तांदूळ ट्रकद्वारे नेणे सुरू होते. हा गोदाम पूर्णतः रिकामा करण्यात आला. येथे नवेगावबांधचे पुरवठा अधिकारी माहुरे कर्तव्यावर होते.­

धानाला राजकीय रंग- धानाच्या या सर्व खेळखंडोब्याला राजकीय रंग आहे. राजकीय बळाचा वापर करून अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे काम केले जाते. अधिकारी बचावात्मक  आदेश काढून सवलत देतात. ओरड झाली की एकमेकांचा बचावही करतात. या व्यवसायात हे कारनामे प्रदीर्घ काळापासून सुरू आहेत. गॉडफादर असल्याने अधिकारीसुद्धा त्याच पद्धतीने वागत असल्याचे जाणवते.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डGovernmentसरकार