शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीराम गहाणे : नवोदय हायस्कूलच्या स्नेह संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : आजची पिढी ही मोबाईल पिढी म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळे परस्परातील संवाद साधणे दूर होत चालले आहे. आत्मीयतेला खिंड पडत असून विद्यार्थ्यांनी साने गुरुजींची ‘शामची आई’ ही पुस्तक एकदा तरी वाचल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. श्रीराम गहाणे यांनी केले.येथील नवोदय हायस्कूल तथा नवोदय कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष तथा माजी आमदार दादासाहेब शेंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर तर पाहुणे म्हणून जि.प.सदस्य अर्चना राऊत, उपसरपंच हीरालाल पाटील शेंडे, सहकार्यवाह रामदास पडोळे, विश्वस्त अशोक हलमारे, चरण चेटुले, डॉ. अशोक गहाणे, बी.एस.मोहतुरे, शामदेव रेहपाडे, से.नि.प्राध्यापक रवि सिंगनजुडे, प्रकाश बोरकर, मनोहरपंत ढोमणे, विद्यार्थी प्रमुख मुनेश्वर लुटे, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रियंका भुसारी उपस्थित होते.माँ सरस्वती, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांच्या पूजनानंतर दीप प्रज्वलीत करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विज्ञान, हस्तकला व ग्रंथ प्रदर्शनीचे निरीक्षण केले. याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोख व भेटवस्तू देवून पालकांसह त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आरेकर यांनी, काळ झपाट्याने बदलत चालला आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यानी आपली गतीशिलता वाढवून आपली प्रगती साधावी. कल्पकता, विचारशक्ती जीवंत ठेवून जीवनातील शर्यती जिंकाव्या. शाळा ही चांगल्या मानव निर्मितीचे उत्तम केंद्र असून प्रज्ञावान विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी आमदार शेंडे यांनी, विद्यार्थ्यांच्या कला व सुप्तगुणांना वाव तसेच त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.प्रास्ताविक प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी मांडले. संचालन मनोहर पाऊलझगडे यांनी केले. आभार संयोजक प्रा. हिवराज साखरे यांनी मानले.

 

टॅग्स :Socialसामाजिक