शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाची पाळ फुटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:56 IST

इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देबाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे.इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारीला नाशिकच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे पितळ उघडे पडले. जिल्ह्यातील इटियाडोह हे मोठे धरण आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. मात्र शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. असे निर्देश धरण सुरक्षा विभागाने संबंधित विभागाला दिले होते. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे या पाळीवर उभी आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे हटवार यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते.यावर धरण सुरक्षा विभाग क्र. २ कार्यकारी अभियंत्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या पत्रात त्यांनी वाढलेल्या झाडांमुळे धरणाचे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन केले नाही. मात्र पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. धरणाची समक्ष पाहणी करुन झाडे काढलेली आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षी निरीक्षण होत असताना ही बाब निरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही? ती अनेक वर्षांपासून पाळीवरच वाढलेली आहेत. यावरुन निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने कालव्यातील झाडांची कटाई होत नसल्याचे सांगितले जाते. तर इटियाडोह प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर उद्या बोलू असे म्हटले.

टॅग्स :Damधरण