शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यामुळे गोंडी संस्कृती जपणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:25 IST

बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात.

ठळक मुद्देराजमाता फुलवादेवी : धनेगाव येथील भाषा संशोधन केंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बदलत्या काळानुसार गोंडी संस्कृतीचा अनेकांना विसर पडला आहे. त्यांचे वाईट परिणाम सुद्धा समाजाला भोगावे लागतात. अशात गोंडी साहित्याच्या माध्यमातून गोंडी संस्कृतीचे जतन करणे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन राजमाता फुलवादेवी यांनी केले.धनेगाव येथील आंचलिक भाषा संशोधन केंद्राला भेट दिली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, गोंडी संस्कृतीला चिरकाळ टिकवून ठेवण्यासाठी गोंडी साहित्य मैलाचा दगड ठरणार आहे. या दिनेशे भाषा संशोधन केंद्र सुरू करुन उषाकिरण आत्राम आणि त्यांच्या सहकाºयांनी मोठी जबाबदारी हाती घेतली आहे. येणाºया काळात गोंडी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी व ती जोपासण्यासाठी गोंडी साहित्य सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असे सांगीतले.राजमाता फुलवादेवी या मांझी सरकार सेनेच्या संचालिका असून दिल्ली येथील आंतरराष्टÑीय कार्यालयातून मांझी सेनेचे संचालन करतात. विदेशात त्यांची मांझी सरकार सेना जल, जंगल व जमिनीचे रक्षण करण्यासाठी सतत कार्य करीत आहे. नुकतेच राजमाता फुलवादेवी यांंनी कचारगडला (धनेगाव) भेट देवून मांझी सरकारच्या सैनिकांशी संपर्क केला. तसेच या भागात आदिवासींच्या विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. या दरम्यान त्यांनी धनेगाव स्थित भाषा संशोधन केंद्राला भेट दिली व सुप्रसिद्ध लेखिका उषाकिरण आत्राम आणि त्यांचे पती गोंडवाना दर्शनचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.आदिवासींच्या बोलीभाषा, गोंडीभाषा, गोंडी शब्दकोष व इतर रचनेबद्दल चर्चा करीत ताराम दाम्प्त्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, गोंडी शब्दकोष हा अत्यंत महत्वाचा दस्तावेज तयार झाल्यामुळे गोंडीभाषा शिकायला व समजायला इतरांना मदत होईल. यावेळी फुलवादेवी यांंनी भाषा, संस्कृती, परंपरा व पारंपरिक ठेवा याबद्दल सुन्हेरसिंग ताराम आणि उषाकिरण आत्राम यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांचा मुलगा कुलदेव कांगे आणि मुलगी अ‍ॅड. राजकुमारी कांगे सोबत उपस्थित होते.१०५ वर्षांपूर्वी कंगला मांझी यांनी मांझी सेना गठित करुन जल, जंगल, जमीन व जीव वाचविण्याचा हेतूने मांझी सेवा सरकार चळवळ सुरू केली होती. पुढे फुलवादेवी यांनी ही चळवळ हाती घेतली व त्या चळवळीचे यशस्वी संचालन करीत आहेत.