लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : आपले भविष्य आपल्या हातात असते. अभ्यास करुन स्पर्धा करावी पण प्रसंगाने नापास झाल्याने दुखी होऊ नये. नापास झाल्यावरच जिद्द वाढते व याच जिद्दीने अधिकारी बनता येथे असे प्रतिपादन मार्गदर्शक व प्रबोधनकार एम.आर.नंदागवळी यांनी केले.येथील जनहिताय सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजीत स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख कृपाल बोरकर होते. उद्घाटन राजेश नंदागवळी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून संजय ठवरे, मनोहर कांबळे, धम्मदीप मेश्राम, ज्ञानू प्रधान, स्वप्नील वासनिक, प्रितम रामटेके, ज्योतीबा माने, भाऊराव मेश्राम आदी उपस्थित होते.स्पर्धेत एकूण ६५ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम क्रमांक शुभम विश्वनाथ मेश्राम, द्वितीय विनोद जांबूवंत जाणवे तसेच तृतीय क्र मांक रेशमा शरद डोंबरे यांनी पटकाविला. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.प्रास्ताविक नितीन कांबळे यांनी मांडले. संचालन करून आभार चंद्रशेखर तिरपुडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी पंकज भैसारे, चेतन येरणे, दिपक प्रधान, रवी औरासे, सबलेश उके, सुमेध खोब्रागडे, आकाश नंदेश्वर, लालचंद मारगाये, सोमनाथ आंदे, प्रतिक तिरपुडे, धनराज मेंढे, खुशाल थेर, काजल तिरपुडे, आकांक्षा भैसारे यांनी सहकार्य केले.
नापास होऊनच अधिकारी बनता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:43 IST
आपले भविष्य आपल्या हातात असते. अभ्यास करुन स्पर्धा करावी पण प्रसंगाने नापास झाल्याने दुखी होऊ नये. नापास झाल्यावरच जिद्द वाढते व याच जिद्दीने अधिकारी बनता येथे असे प्रतिपादन मार्गदर्शक व प्रबोधनकार एम.आर.नंदागवळी यांनी केले.
नापास होऊनच अधिकारी बनता येते
ठळक मुद्देएम.आर. नंदागवळी : स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन