शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ बुद्धिमत्ता नव्हे कर्तृत्व महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:00 IST

प्रशासकीय सेवेत काम करतांना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडवितांना आधी स्वत:ला ओळखा.

ठळक मुद्देअविनाश धर्माधिकारी : कॅरिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा, फार्च्यून फाऊंडेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रशासकीय सेवेत काम करतांना बरेच अनुभव आले. केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे आहे. मेंदू चांगला असेल तर प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत आहे. कुठल्याही क्षेत्रात कॅरिअर घडवितांना आधी स्वत:ला ओळखा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर यशस्वी होण्यासाठी घेतलेले कठोर परिश्रम हेच यशाचे रहस्य असल्याचे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.फार्च्यून फाऊंडेशन व चाणक्य मंडळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरिअर आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर मंगळवारी (दि.३१) येथील जलाराम बाप्पा लॉनच्या सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी फार्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले, शिक्षक आमदार ना.गो.गाणार, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, कार्यक्रमाचे संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमिद, सभापती विश्वजीत डोंगरे, शैलजा सोनवाने, आशीष वांदिले, भाजपा जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, भाऊराव ऊके, शहर अध्यक्ष सुनील केलनका, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव वीरेंद्र जायसवाल, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, नगरसेवक भरत क्षत्रिय, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर आरेकर उपस्थित होते. या वेळी धर्माधिकारी यांनी, स्पर्धा परीक्षा, मुलाखत प्रक्रिया, व्यक्तिमत्व विकास व कॅरिअर घडविणाऱ्या अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. प्रशासकीय सेवा हे देशसेवेचे माध्यम असल्याचे सांगून दरवर्षी गोंदिया येथे या कार्यक्रमासाठी येणार असल्याची ग्वाही दिली. सोले म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्य केलेले अविनाश धर्माधिकारी हे तरुणाचे आयुष्य घडविन्याचे काम करीत आहेत. जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाने युवकांना कॅरिअरच्या योग्य दिशा नक्कीच सापडतील.फार्च्यून फाऊंडेशनतर्फे१० सप्टेंबरला गोंदिया येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अनेक कंपन्याच्या माध्यमातून मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया राबविली जाणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विनोद अग्रवाल यांनी कॅरिअर व स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मौलाचे ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सविता बेदरकर यांनी केले.