शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार

By admin | Updated: February 7, 2015 23:25 IST

जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का?

काँंग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों कार्यकर्ते व नागरिकगोंदिया : जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का? असा सवाल करीत हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार आहे, असा हल्ला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनील केदार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, अशोक लंजे, अमर वऱ्हाडे, राजेश नंदागवळी, डॉ.योगेंद्र भगत, नामदेव किरसान आदी अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या, कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ करा, भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश परत घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, गॅस पुरवठा धोरण पुर्ववत करा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता सर्कस मैदानावरून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकराने सत्तेत आल्यापासून केवळ घोषणाच केल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदारानेही ही बाब खासगीत कबुल करताना सरकार किती नाकर्ते आहे हे सांगितल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मराठवाड्यासारख्या क्षेत्रात कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र या सरकारच्या काळात तेथील आत्महत्या वाढल्या आहेत. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करून आता ‘बुरे दिन’ आले असल्याचे ते म्हणाले.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नसून केवळ भांडवलदारांचे असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली खुर्ची वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणतील तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रातील उद्योग आणि पाणी गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे ते म्हणाले.धानाला ५०० रुपये बोनस दिला नाही तर कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्याला गावात येऊ देऊ नका, असे सांगून त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्यासाठी आंदोलन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपली चूक सुधारण्याचे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)