शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची नोंद निक्षण प्रणालीवर करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खाजगी वैद्यकीय व्यावसायीक तसेच शासकीय आरोग्य संस्थेंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना निक्षण पोषण योजनेचा ...

ठळक मुद्देदीपक कुमार मीना : खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खाजगी वैद्यकीय व्यावसायीक तसेच शासकीय आरोग्य संस्थेंतर्गत उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना निक्षण पोषण योजनेचा लाभ मिळण्यासाठी क्षयरुग्णांची नोंद ही निक्षण प्रणालीमध्ये करणे अनिवार्य आहे अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी क्षयरोग नियंत्रणाला घेऊन आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आर.जे.पराडकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत डॉ. पराडकर यांनी, संगणकीय सादरीकरणाद्वारे क्षयरोग नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती विषद केली. क्षयरुग्णाची नोंद करण्यासाठी ५०० रुपये अनुदान देण्यात येते. तसेच क्षयरुग्णाच्या उपचाराअंती आऊटकमची नोंद केल्यानंतर ५०० रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी वेळेवर क्षयरुग्णांची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. सर्व क्षयरुग्ण निदान करणाऱ्या व क्षयरुग्णास उपचार देणाऱ्या आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थेचे नाव निक्षय प्रणालीमध्ये नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी. सर्व क्षयरोग संबंधिच्या प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे तसेच संपूर्ण कालावधीचा उपचार हा शासकीय आरोग्य संस्था तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये विनामूल्य केला जातो, त्या सोयी-सुविधांचा क्षयरुग्णांनी लाभ घ्यावा असे सांगण्यात आले. या वेळी नागपूर विभागाचे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. अनिरुध्द कडू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी पांचाळ, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक उदय खर्डेनवीस, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व स्वयंसेवी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

६ महिन्यांची शिक्षा क्षयरुग्णांची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र आता तसे चालणार नसून निक्षय पोर्टलमध्ये नोंद न केल्यास भांदवि. कलम २६९ व २७० अन्वये ६ महिने कारावास अथवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल