शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात साकारणार सिंचन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:31 IST

शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात सिंचन विभागाची विविध कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून आ. गोपालदास अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्यासमोर मांडली.

ठळक मुद्देपाच कोटींचा खर्च : अधीक्षक अभियंत्याची होणार नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात सिंचन विभागाची विविध कार्यालये आहेत. मात्र या कार्यालयांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेवून आ. गोपालदास अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्यासमोर मांडली.यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोंदिया येथील सिंचन भवनाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे.मागील अनेक वर्षांपासून शहरात सिव्हील लाईन्स परिसरात सिंचन विभागाच्या अभियंत्यांची कार्यालये आहेत. येथील जुन्या, जीर्ण इमारतींमुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. तर विविध ठिकाणी कार्यालये असल्याने कामाचा समन्वय साधताना अडचण निर्माण होत होती.आ. गोपालदास अग्रवाल यांनी गोंदियाच्या मध्यम प्रकल्प सिंचन विभाग, बाघ सिंचन विभाग, गोंदिया सिंचन विभाग आदी विभागांच्या कार्यालयांना हनुमान चौक, सिव्हील लाईन्स येथील सिंचन विभाग परिसरात प्रशस्त इमारतीचे बांधकाम करून एकाच ठिकाणी आणण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. यांसंदर्भात त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून याबाबत माहिती दिली.गोंदिया जिल्ह्यात वाढत असलेल्या सिंचन योजनांना लक्षात घेवून येथे तिन्ही सिंचन विभागांच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्याची आणि सिंचन भवनाच्या बांधकामासाठी मंजुरी देण्याची विनंती केली होती.या संदर्भात राज्य नियामक मंडळाची ३१ जानेवारी २०१८ रोजी सिंचन मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. महाजन यांनी गोंदियात सिंचन भवनाच्या बांधकामास मंजुरी दिली.गोंदिया येथे अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिंचनाशी संबंधित कार्यांना गती मिळेल. या समितीत सिंचन सचिव चहल, वित्त सचिव पोरवाल यांच्यासह अनेक मोठे अधिकारी सदस्य आहेत.शासकीय कार्यालये एकत्र आणण्याचा प्रयत्नशासकीय कार्यालयांची व्यवस्था सुरळीत व व्यवस्थित असावी, यासाठी आ. अग्रवाल यांचे प्रयत्न उल्लेखनिय आहेत. यात गोंदियाच्या आंबेडकर चौकात ४० कोटींच्या खर्चाचे अनेक माळ््याच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. येथे शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना चांगली सुविधा होईल. गोंदिया कार्यरत वनविभागाच्या पाच वेगवेगळ्या कार्यालयांना कुडवा नाका येथील वन विभागाच्या परिसरात भव्य वनभवनाचे बांधकाम करून सर्व वनविभागांच्या जिल्हा वनाधिकाºयांना एकाच ठिकाणी आणण्याचे कार्य सुद्धा करण्यात आले आहे.