लक्ष देणार- मुनगंटीवारतिरोडा : ज्या लोकांसाठी भगतसिंग फासावर चढलेले त्याच लोकांसाठी काम करणे हे आमचे ध्येय आहे. सामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे. राकाँ व काँग्रेसची विकासाची गाडी २० किमी वेगाने धावत असेल तर आमच्या विकासाची गाडी १०० किमी वेगाने निश्चितच धावेल असे सांगून सिंचन, शिक्षण व रोजगार या क्षेत्राकडे मी लक्ष देणार आहे, अशी ग्वाही वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तिरोडा येथे आयोजित सुशासन दिवस व सत्कार समारंभात ते बोलत होते.तिरोडा येथील आमदार कार्यालयासमोरील पटांगणावर माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त सुशासन दिवस व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम, खा.नाना पटोले, आ.अनिल सोले, आ.अॅड. रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.संजय पुराम, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांच्यासह माजी आमदारगण प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविकातून आ. विजय रहांगडाले यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रातील शेती, सिंचन, बेरोजगारी अशा समस्या सांगून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीएकरी ३००० रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना लाकडे वाहून नेण्यासाठी ७/१२ मालकी परवानगी देण्यात यावी. मोहफुलावरील बंदी उठवावी, बांबू लाकूड यावर उद्योग निर्माण व्हावे, वसतिगृहात आधुनिक व्यायामशाळा व्हावी, रेल्वे बाबतीत विदर्भ एक्सप्रेस व गोंदिया-शेगावचा थांबा तिरोडा येथे द्यावा, तिरोडा ते काचेवानीपर्यंत चौपदरीकरण तसेच रेल्वे फाटकवर उड्डाणपूल करावा, अशा विविध मागण्या मांडल्या. यावेळी उपस्थित खासदार-आमदारांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आ.रहांगडाले यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाला हरिष मोरे, भजनदास वैद्य, खोमेश्वर रहांगडाले, हेमंत पटले, डॉ.खुशाल बोपचे, कशिश जैस्वाल, मोरेश्वर कटरे, बाळा अंजनकर, दीपक कदम, चित्ररेखा चौधरी, विष्णूपंत बिंझाडे, सिता रहांगडाले, डॉ. लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, विरेंद्र अंजनकर, डी.के.झरारिया, सुहास काळे, सुभाष आकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन जि.प.उपाध्यक्ष मदन पटले तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यावेळी रक्तदान शिबिर, सिकलसेल उपचार मार्गदर्शन शिबिर व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितेश पंजवाणी, सुधीर मेश्राम, शुक्राचार्य ठाकरे, स्वानंद पारधी, डिलेश पारधी, पिंटू रहांगडाले, बंडू सोनवाने, रामलाल बाळणे, वनमाला डहाके, सलामभाई शेख, डॉ. वसंत भगत, चतुर्भूज बिसेन तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी मोलाची सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
सिंचन, शिक्षण व रोजगाराकडे
By admin | Updated: December 27, 2014 02:02 IST