शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

सिंचन क्षेत्रात ११ हजार हेक्टरने वाढ

By admin | Updated: February 1, 2016 01:45 IST

अनेक ठिकाणची शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी दुबार पीक किंवा रबीचे पीक घेण्यास धजावत नव्हते.

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित : विविध कामांवर २६९८.५५ लाख खर्चदेवानंद शहारे गोंदियाअनेक ठिकाणची शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी दुबार पीक किंवा रबीचे पीक घेण्यास धजावत नव्हते. मात्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केल्याने अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. तळे व बोडीतील गाळ काढून पाण्याचा साठा वाढविण्यात आला. या प्रकाराने जिल्ह्यात आता ११,०२०.११ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले आहे.जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील एकूण ९४ गावांमध्ये राबविण्यात आले. एमआय-झेडपी (मायनर एरिकेशन), एमआय-लोकल सेक्टर, वन विभाग व कृषी विभाग यांच्या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील २४ गावे, तिरोडा येथील २४, गोरेगाव येथील १३, आमगाव येथील ४, देवरी येथील ७, सालेकसा येथील १३, अर्जुनी-मोरगाव येथील ४ व सडक-अर्जुनी येथील ५ गावांचा समावेश आहे. पूर्वी जिल्ह्यात ३१,५७६ हेक्टर सिंचित क्षेत्र होते. मात्र आता सदर ९४ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आल्याने त्यात ११,०२०.११ हेक्टर सिंचन क्षेत्राची वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्यावतीने करण्यात आलेल्या कामांवर आतापर्यंत २६९८.५५ लाख रूपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे. यात एकूण ३९०८.७० हेक्टरमधील १,०६० कामांपैकी २,६३४ हेक्टरमधील ८३१ कामे पूर्ण झालेली आहेत. तर ५४ कामे प्रगतिपथावर असून सध्या १७५ कामे बंद आहेत.जलयुक्त शिवारची ८३१ कामे पूर्णसलग समतल २० हेक्टरमध्ये चार कामे, माती नाला बांधकाम १८, मजगी ५६ हेक्टरमध्ये सात, गेबियन स्ट्रक्चर ३४, शेततळे ६०, साखळी सिमेंट बंधारे ५३, सिमेंट बंधारा दुरूस्ती १, नाळा खोलीकरण-सरळीकरण १५, केटी वेअर १, गाळ काढणे शासकीय ९९, गाळ काढणे सीएसआर ४६, ठिंबक सिंचन १७५.७ हेक्टरमध्ये २३९ कामे, १२.०४ हेक्टरमध्ये ८ कामे, वनतलाव १, भात खाचर दुरूस्ती २,३७० हेक्टरमध्ये १५८ कामे, साठवण बंधारा २४, बोडी खोलीकरण-जुनी बोडी दुरूस्ती ४३, तलाव खोलीकरण-दुरूस्ती १६, मामा तलाव दुरूस्ती ३ व लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती १ अशी एकूण ८३१ कामे पूर्ण झालेली आहे.