शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

अवैध रेतीची वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:36 IST

तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे.

सालेकसा : तालुक्यातील बिंझली परिसरात कुआढास नाल्यातून अवैध रेतीचा उपसा करून वनीकरणाच्या जागेवरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अनेक वृक्षांचे नुकसान झाल्याचा आरोप येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरीया यांनी केला आहे. तसेच या परिसरातून रेती वाहतूक थांबविण्याची यावी, वृक्षांची सुरक्षा करण्यात सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.मागील जुलै महिन्यात राज्य शासनाने दोन कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला होता. त्या अंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. बिंझली गावाच्या १० हेक्टर परिसरात जवळपास २५ हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. त्या वनीकरणाला कुंपणसुद्धा करण्यात आले होते. परंतु त्या परिसरातूनच अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करावी लागत असल्यामुळे त्यांना रस्ता देण्यात आला. परंतु रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी कुंपण जास्त प्रमाणात हटवून वनीकरण केलेल्या परिसरातून रेतू वाहतूक करणे सुरू केले. ६ फेब्रुवारीला महसूल विभागाने तीन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करताना पकडले व कारवाई केली. परंतु या दरम्यान अनेक वृक्षांची नासधूस झाली आहे. तसेच कुंपण तोडल्यामुळे गाव परिसरातील जनावरेसुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड परिसरात जावून चरतात, त्यामुळे जनावरांनीही अनेक वृक्ष नष्ट करून टाकले आहेत. या प्रकारामुळे शासनाची दोन कोटी वृक्ष लागवड योजना यशस्वी होणार की लोकांच्या असहकार्यामुळे मोठ्या परिश्रमाने लावलेले वृक्ष जमीनदोस्त होतील किंवा गुरांचा चारा बनून राहतील, असे सदर परिस्थिती पाहून वाटते. वृक्षांची जोपासना व्हावी म्हणून वन व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांसह सचिव यांचीसुद्धा देखरेख व निगा आवश्यक असते. परंतु सचिव व वन क्षेत्र सहायक सी.जी. मडावी येथील वृक्षांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पूनमचंद गिरिया, उपाध्यक्ष जियालाल लिल्हारे, कोषाध्यक्ष लेखसिंह मस्करे, सहसचिव गणेश लिल्हारे, सदस्य हरिलाल रत्नाकर, छबिलाल लिल्हारे, रमेश सूर्यवंशी, नोहरलाल लिल्हारे, रमणलाल रत्नाकर, रामदास ढेकवार यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)गावातील मतभेदांमुळे नुकसानबिंझली परिसरात १० हेक्टर जागेवर २५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या परिसरातच शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी आधीपासूनच पांदण रस्ता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड केली तेव्हा त्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला. वृक्षांच्या देखरेखीची जबाबदारी वन विभाग व वन व्यवस्थापन समितीची असली तरी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. परंतु बिंझली गावात गटबाजी आणि आपसात वैमनस्य असल्यामुळे वृक्षांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच त्या ठिकाणातून रेतीची वाहतूक होते. त्यामुळे वनीकरण बाधित होत आहे.