शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध मुरूम उत्खनन प्रकरण थंडबस्त्यात

By admin | Updated: September 3, 2016 00:03 IST

येथील गट क्रमांक ६८ या शासकीय जागेतून २४० ब्राम मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन झाले.

कारवाई नाहीच : गावात विविध चर्चांना ऊतबाराभाटी : येथील गट क्रमांक ६८ या शासकीय जागेतून २४० ब्राम मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन झाले. यातील १९० ब्रास मुरूमाचे अवैध उत्खनन असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र असे असतानाही काहीच कारवाई झाली नसून प्रकरण थंडबस्त्यात गेल्याचे गावकरी बोलत आहेत. या अवैध मुरूम प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांचा हात असल्याचे तहसील कार्यालयाकडून कळले. ग्रामपंचायतने गावच्या रस्ता सबळीकरणासाठी ५० ब्रास रॉॅयल्टी काढली होती. परंतू ही रॉयल्टी रिकामीच होती व १२ ट्रॅक्टरपैकी एकाही ट्रॅक्टराला देण्यात आली नाही. परंतू दोन ट्रॅक्टर १६ अ‍ॅगस्ट रोजी पोलिसांनी पकडल्याचे गावकऱ्यांनी बघितले. ५० ब्रास रॉयल्टी कोरीच आहे. या शासकीय जागेची मौका तपासणी व मोजमाप केले तेव्हा २४० ब्रास मुरूम खोदले असल्याचे समजले. म्हणजेच १९० ब्रास अवैधरित्या ग्रामपंचायतने खोदे आहे असे समजले. ५० ब्रास मुरूमापैकी गावातील रस्त्यावर, आंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा तर काही नागरिकांच्या घरी असा वापर झाला. तर उर्वरीत मिरून बाहेरगावी विकला गेला असे गावकरी सांगतात. असे अवैध धंदे ग्रामपंचायत करणार तर गावचा विकास कसा होणार असे गावकरी बोलत आहेत. असे असतानाही संबंधीत विभागाने मालाची जप्ती केली नसून कोणतीही कारवाई केली नसल्याचे गावकरी व पदाधिकारीही सांगत आहेत. प्रकरणी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांना विचारणा केली असता त्यांनी, सहा लाख ४६ हजार रूपयांचा दंड होणार असल्याचे सांगीतले. मात्र हा दंड होणार कुणाला, किती जणांना किती दंड व प्रकरणात कुणाचा समावेश आहे याबाबत मागील १५ दिवसांपासून गावात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणात संबंधीत विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)