शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथभेटीतून कर्तव्याचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:52 IST

राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित येथील जेष्ठ ग्रंथमित्र अ‍ॅड. डॉ. श्रावण उके यांनी अमृत महोत्सवी वाढदिवशी

ग्रंथमित्र उके यांचा उपक्रम : अमृत महोत्सवानिमित्त वाचनालयांना ग्रंथांची भेट देवरी : राज्य शासनाच्या ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित येथील जेष्ठ ग्रंथमित्र अ‍ॅड. डॉ. श्रावण उके यांनी अमृत महोत्सवी वाढदिवशी शासनमान्य १८ ग्रंथालयांना १२५ ग्रंथ भेट देऊन आपल्या कर्तव्याचा परिचय दिला. हा सोहळा रविवारी (दि.२८) मोठ्या उत्साहात येथे पार पडला. यानिमित्त डॉ. उके लिखीत ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. या अमृत महोत्सवाची सुरूवात जेष्ठ कवी शिवानंद पाठक यांच्या काव्यपंक्तीने करण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी खेमेंद्र बोपचे, नगराध्यक्ष सुमन बिसेन, समाज कल्याण मंत्रालयाचे माजी उपसचिव उत्तम शिंगाडे, भदंत महापंत, महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सविता पुराम, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगडीया, सामाजिक कार्यकर्ता शांतीलाल जैन, विष्णुप्रसाद अग्रवाल, नगरसेवक यादोराव पंचमवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश चांदेवार, डॉ. अनिल चौरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अ‍ॅड. श्रावण उके यांचा जीवनावर आधारीत चित्रपट दाखविण्यात आला. दरम्यान डॉ. उके लिखीत ‘व्यक्ती आणि कार्य’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. उके यांनी वयाची पंच्याहत्तरावी गाठल्या निमित्त त्यांच्या कुटूंबीयांनी तालुक्यातील १६ आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील २ अशा एकूण १८ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना मराठी भाषेतील ७५ ग्रंथ आणि मुंबईच्या लाईट इनर लाईट या संस्थेच्यावतीने इंग्रजी भाषेतील ५० ग्रंथ असे एकूण १२५ ग्रंथाचा संच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचा शतकात्तर रौप्य महोत्सव निमित्त भेट म्हणून देण्यात आले.संचालन सपना बन्सोड यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उके यांचे नातू हर्षवर्धन भिमटे यांनी मांडले. आभार शारदा उके यांनी मानले. कार्यक्रमाला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लेखक, कवी, साहित्यीक व ज्यांची पुस्तके प्रकाशित झाली अशा व्यक्तींसह समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती, अधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)