लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्याच्या जंगलीटोला घाटटेमणी येथील भोजराज देवलाल पटले (५०) यांच्या घरी २५ आॅक्टोबरच्या रात्री ११ वाजता दरोडा टाकून ४ लाख २ हजाराचा माल पळवून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ नोव्हेंबरला अटक केली. त्यांची विचारपूस केल्यावर त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.जंगलीटोला घाटटेमणी येथील भोजराज देवलाल पटले (५०) यांना व त्यांच्या कुटुंबीयांना देशीकट्टा व तलवारीच्या धाक दाखवून चौघांनी ४ लाखाने २५ ते २६ आॅक्टोबरच्या रात्री दरम्यान लुटले होते. त्यांना देशीकट्टा व तलवारीचा धाक दाखवून भोजराज यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिणे, त्यांच्या सुनेच्या अंगावरील दागिणे व आलमारीलतील ३ लाख ५० हजार २०० रूपयाचे दागिणे, १५ हजार रोख, ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल, ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४ लाख २ हजार ५०० रूपयाचा माल पळविला होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ५४२, ३९२, ३९७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गांभीर्याने घेऊन गुप्त माहिती काढली असता याप्रकणातील आरोपी भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार चुन्नीलाल बोरकर याचे ते साथीदार असल्याचे लक्षात आले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संजय शंकर गोरले (३५) रा. बाबुपेठ, सम्राट अशोक चौक, चंद्रपूर याला चंद्रपूर येथून अटक केली. चुन्नीलाल तुळशीराम बोरकर (६०) रा. साकोली जि. भंडारा, अनिल चुन्नीलाल बोरकर (३४) रा. शिवाजी वॉर्ड साकोली यांना साकोली येथून, कपिल सय्यद अली (२८) रा. सिरोंज जि. विदीशा याला भोपाळ येथून ताब्यात घेतले.या प्रकरणातून चोरलेले साहित्य व वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रोद बघेले, कर्मचारी तुलसीदास लुटे, गोपाल कापगते, राजकुमार पाचे, विनय शेंडे, मधुकर कृपाण, सुखदेव राऊत, राजेश बढे, नेवालाल भेलावे, विजय रहांगडाले, अजय रहांगडाले, भुवनलाल देशमुख, अजय रहांगडाले, रेखलाल गौतम, भुमेश्वर जगनाडे, दिक्षीतकुमार दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, धनंजय शेंडे, संजय महारवाडे, मोहन शेंडे, विनोद बरैय्या, महिला पोलीस कर्मचारी सुजाता गेडाम, वाहन चालक मुरलीधर पांडे, पंकज खरवडे, विनोद गौतम यांनी केली आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेशात दरोडेअटक करण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, मध्यप्रदेशातील बालाघाट भोपाळ येथे दरोडे घातले आहेत. त्यांच्यावर खून, दरोडा, चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे दाखल आहेत.
दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:04 IST
आमगाव तालुक्याच्या जंगलीटोला घाटटेमणी येथील भोजराज देवलाल पटले (५०) यांच्या घरी २५ आॅक्टोबरच्या रात्री ११ वाजता दरोडा टाकून ४ लाख २ हजाराचा माल पळवून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ नोव्हेंबरला अटक केली.
दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
ठळक मुद्देचौघांना अटक : जंगलीटोला येथील चोरीची कबुली