शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अपघात विम्याप्रकरणी विमा कंपनीला झटका

By admin | Updated: March 12, 2015 01:12 IST

शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला.

गोंदिया : शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. शेतकऱ्याला पत्नीला एक लाख रूपये देण्याचा आदेश सदर न्यू इंडिया विमा कंपनीला दिला.देवरीच्या वॉर्ड-३ येथील रहिवासी शेतकरी राजकुमार हिरामन वैद्य यांचा मृत्यू ५ मार्च २०१२ रोजी ट्रक चालकाच्या बाजून बसून जाताना ट्रेलरने दिलेल्या धडकेत झाला. त्यांची पत्नी मंजू वैद्य यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा दावा दाखल केला. मात्र जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटूनही सदर कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर, असे कळविले नव्हते. त्यामुळे तिने नुकसान भरपाईसह त्रासाचा खर्च मिळविण्यासाठी न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने विरुद्ध पक्षाचे न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व देवरीचे तालुका कृषी अधिकारी यांना नोटिसेस पाठविल्या. त्यांनी न्यायमंचात उपस्थित राहून आपला लेखी जबाब नोंदविला. त्यात मंजू वैद्य यांनी व्हिसेरा रिपोर्ट सादर न केल्यामुळे दावा फेटाळण्यात आल्याचे व तसे कळविल्याचे नमूद केले. तसेच मृतकाच्या रासायनिक पृथ:करणाच्या अहवालाबाबत डॉक्टरांचे अभिप्राय प्रमाणपत्र मिळत नसल्याबाबत वारसदाराचा अर्ज आल्याचे कृषी अधिकाऱ्याने नमूद केले होते. तक्रारकर्ती मंजू वैद्यच्या बाजूने अ‍ॅड. उदय क्षिरसागर व विरूद्ध पक्षाच्या बाजूने अ‍ॅड.इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. याबाबत न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात शेतकरी राजकुमार वैद्य यांचा मृत्यू ट्रक चालकाच्या बाजूने बसून जाताना ट्रेलरच्या धडकेत झाला. शासन निर्णयानुसार रस्ता अपघाताबाबत दावा करताना जे कागदपत्रे लागतात, त्यात कुठेही रासायनिक विश्लेषण अहवालावर संबंधित डॉक्टरचे मत आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. चालक वगळता शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसदारांना दावा रक्कम देण्याचे स्पष्ट नमूद आहे. (प्रतिनिधी)