शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी दिले कारवाई करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 22:11 IST

शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती.

ठळक मुद्देसक्तीच्या नावावर लूट : पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सिंधू सेनेने घेतला पुढाकार, अन्य संघटना देणार निवेदन

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची दखल घेत परवाना न घेता पाठ्यपुस्तकांची विक्री करणाऱ्या शाळांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे खासगी इंग्रजी शाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.शहरातील काही खासगी शाळांनी शाळेतच पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विक्रीची दुकाने थाटली होती. शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली. पाठ्यपुस्तकांची बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त दर आकारुन विक्री केली जात होती. काही पालकांनी याचा विरोध दर्शवित पाठपुस्तके शाळेत खरेदी करणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र खासगी शाळा व्यवस्थापनाने शाळेतून पाठपुस्तके घ्यायची नसतील तर तुमच्या पाल्याला आमच्या शाळेत शिकवू नका, असे उत्तर दिले जात होते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे नुकसान होवू नये म्हणून शांत राहण्याची भुमिका घेतली. खासगी शाळांकडून पाठपुस्तकांच्या नावावर सुरू असलेल्या लूटीचा मुद्दा लोकमतने लावून धरला.खासगी शाळांना शाळेत पाठ्यपुस्तकांची विक्री करता येत का, शाळांकडे पाठपुस्तके विक्रीचा परवाना आहे का, पाठपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करता येत का, या सर्व गोष्टींची सखोल माहिती घेतली. तेव्हा पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी एकाही खासगी शाळेने नगर परिषद परवाना विभागाकडून परवाना घेतला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. तर खासगी शाळांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती करता येत नाही. अशा शाळांवर शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत कारवाई करता येत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना सांगितले. हे सर्व मुद्दे लोकमतने लावून धरल्यानंतर पालकांनी खासगी शाळांकडून होत असलेल्या लुटीविरोधात संताप व्यक्त केला. या विरोधात जिल्हाधिकाºयांना पाचशे पत्र पाठविण्याचा संकल्प पालकांनी केला. याची दखल घेत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी परवाना विभागाला पत्र देवून परवाना न घेता शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांची विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच अशा शाळांची यादी मागवून त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे खासगी शाळां व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.सिंधू सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनशहरातील खासगी शाळांकडून पाठ्यपुस्तकांच्या सक्तीच्या नावावर सुरू असलेली पालकांची लूट थांबविण्यात यावी. तसेच या शाळांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्कात वाढ केली जात आहे. यासर्व प्रकाराला प्रतिबंध लावण्यात यावे. या मागणीचे निवेदन सिंधू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. निवेदनातून खासगी शाळांकडून पालकांची होत असलेली लूट थांबवून कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात शहरध्यक्ष विनोद बसंतानी, देवानंद फेरवानी, दिलीप गोपलानी, राजकुमार नोतानी, राहुल लोहाना, राम नोतानी, अनिल ककवानी, विक्की बजाज, रवि वलेचा, श्याम लालवानी, गिरीश बिल्दानी, दिलीप तोलानी, अमर रामानी आदींचा समावेश होता.शिक्षण विभागाची बघ्याची भूमिकाशहरातीलच अनेक खासगी इंग्रजी शाळांकडून पाठ्यपुस्तकांच्या सक्तीच्या नावावर पालकांची लूट करीत आहे. याबाबत पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. काही पालकांनी याबाबतचे निवेदन जि.प.शिक्षण विभागाला दिले.मात्र त्यांनी अद्यापही एकाही खासगी शाळेला भेट देवून कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाप्रती पालकांमध्ये रोष व्याप्त आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकcollectorजिल्हाधिकारी