शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकाऱ्यांवरच कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:24 IST

सडक-अर्जुनी नगर पंचायतमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले होते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे भोवले : सडक-अर्जुनी नगर पंचायत प्रकरण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : सडक-अर्जुनी नगर पंचायतमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच सदस्यी चौकशी समिती गठीत केली होती. मात्र चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी चौकशी करुन अहवाल सादर न केल्याने चौकशी समितीतील अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बडोले यांनी दिले आहे.प्राप्त माहितीनुसार पालकमंत्री बडोले यांनी ६ जानेवारीला सडक-अर्जुनी नगर पंचायत येथील गैरप्रकाराची चौकशी करुन ३१ जानेवारीपर्यत चौकशी अहवाल तयार करुन तो जिल्हाधिकाºयांना सादर करण्याचे निर्देश पाच सदस्यीय चौकशी समितीतीला दिले होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही चौकशी समितीतील एकाही अधिकाऱ्यांने चौकशी अहवाल सादर केला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांच्या गृह गावातील ही नगरपंचायत असल्याने व त्यांनी दिलेल्या निर्देशानंतरही चौकशी समितीने अहवाल सादर केला नाही.त्यामुळे अधिकारी पालक मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याचा आरोप तक्रारकर्त्या नगरसेवकांनी केला. तसेच पालकमंत्री बडोले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकमंत्र्यांचे आदेश अधिकारी पाळत नसतील तर सर्व सामान्य जनतेची कामे खरोखरच करत असतील काय? असा सवाल सुध्दा उपस्थित केला जात होता.दरम्यान या सर्व गोष्टींची पालकमंत्री बडोले यांनी गांर्भीयाने दखल घेत २५ मार्च ला जिल्हाधिकाºयांना पत्र देवून ३१ जानेवारीपर्यंत चौकशी अहवाल सादर न करणाऱ्या चौकशी समितीतील पाचही अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना दिले आहे.विशेष म्हणजे चौकशीसाठी गठीत केलेल्या चौकशी समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जाते.दुसरी चौकशी समिती गठीत करासडक-अर्जुनी नगर पंचायत कार्यालयात प्रशासकीय काळापासून ते आत्तापर्यंत गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी दुसरी चौकशी समिती गठीत करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून दिले आहेत. आता ही समिती किती दिवसात अहवाल देते याकडे लक्ष लागले आहे.प्रशासनावर वचक कुणाचाअलीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड वाढली आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींची सुध्दा हीच तक्रार असल्याने प्रशासनावर नेमका वचक कुणाचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले