शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दुधात भेसळ सुरूच

By admin | Updated: November 2, 2014 22:38 IST

दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातदेखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी

गोंदिया : दूध हा प्रत्येकाच्या दैनंदिन वापरातील अत्यंत आवश्यक पदार्थ आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातदेखील दुधापासून तयार झालेल्या चहानेच होते. मात्र दूध विक्रेते कमीत कमी वेळात अल्पसा श्रम करून लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल यासाठी सतत धडपड करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. दुधात भेसळ करून अधिकचा नफा मिळविण्याचा बेतात आपणच आपल्या जवळील असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळ करीत आहोत, ही बाब कदाचित विसरली जात आहे. प्रत्येकांची दैनंदिन गरज असलेल्या दुधामध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांची भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई करीत नसल्याने दुधात भेसळ करण्याच्या गोरखधंदा परिसरात फोफावाला आहे.दूध लहान चिमुकल्या मुलाबाळांसाठी अमृत समझला जातो. डॉक्टरही आजारी रुग्णांना दूध पिण्याचा सल्ला देतात. दुधामध्ये असलेले भरपूर प्रथिने मानवी आरोग्याकरिता लाभदायक असले तरी हिंदु संस्कृतीप्रमाणे दुधाला एक पवित्र द्रव्य म्हणून दुधाचा उपयोग होमहवन, पूजापाठ यात केला जातो. मात्र सध्या बाजारात विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या दुधाच्या शुध्दीकरणावर भेसळखोरीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बऱ्याच दूध व्यवसायिकांनी दुधामध्ये भेसळ करून त्या दुधाची राजरोसपणे विक्री करण्याला आपला व्यवसाय केला आहे. हा व्यवसाय करताना आपण आपल्याच लोकांचा जीवाशी खेळ करीत असल्याची बाब ते विसरले आहेत. पूर्वी मद्य विक्रीत होणारी भेसळ सर्वांनाच ठाऊक होती. मात्र आता मद्यात भेसळीचे प्रमाण कमी होऊन दुधात कितीतरी पटीने भेसळीचे कळस गाठले आहे. सदर दूध विक्रेते सॉकरीन माल्टवेट पावडर, कपडे धुण्याचा सोडा, शॅम्पू, फोटो धुण्याचे रसायन, साखर, वनस्पती, तेल, युरिया आदी रसायनांचा वापर करून दुधाला विषात रुपांतर करण्याचा प्रकार परिसरात जोमात सुरू आहे. काही दूध विक्रेते तर चक्क रासायनिक पध्दतीने दुधाची निर्मिती करीत असल्याची चर्चाही होताना दिसून येत आहे. हे रासायनिक दूध शुध्द दुधासारखे दिसते. त्याची चवदेखील नैसर्गिक दुधासारखीच असते. त्यामुळे कुणीही सदर दूध भेसळयुक्त असल्याची कल्पनाही करू शकत नाही. अशा दूध विक्रीतून विक्रेते कमी परिश्रम करून जास्तीत-जास्त नफा कमवित आहेत. भेसळ करण्याकरिता लागणारे रासायनिक द्रव्यही बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जाते. हा प्रकार तालुक्यात बिनधास्तपणे सुरू आहे. बऱ्याच महिन्यांपासून एकही दूध विक्रेत्यावर कारवाई झाली, असे ऐकीवात नाही. त्यामुळे भेसळखोरांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. आपण दूध सेवन करीत नसून जहरच सेवन करीत आहोत, याची थोडीसी कल्पनाही सर्वसामान्य लोकांना नसते. म्हणूनच हा व्यवसाय राजरोसपणे तालुक्यात जोमाने सुरू आहे. संबंधित विभागाने त्वरीत लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)