शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तेढा येथील मामा तलाव खोलीकरणाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:37 IST

जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे.

ठळक मुद्देज्योती वालदे : शेतकऱ्यांवर अन्याय, दोषींवर कारवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे.तेढा येथील मामा तलाव ९० एकर परिसरात पसरला आहे. या मामा तलावातून पांगोली नदीचा उगम झाला आहे. या तलावाचे खोलीकरण करून गाळ काढणे, पाणी क्षमतेनुसार पाळीला पिचींग व इतर कामांसाठी लघू पाटबंधारे विभागाने ५३ लाख २५ हजार रुपये मंजूर केले. मातीकाम खोदकाम हे २५ हजार घनमीटर होणार असून त्या कामाकरीता २९ लाख रु पये, पिचींग व इतर कामांसाठी ३४ लाख २५ हजार रु पये मंजूर झालेले आहेत.खोलीकरण कामाची सुरुवात जेसीबी यंत्राव्दारे करण्यात आली.परंतु लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता दिलीप चौरागडे यांनी कंत्राटदारासह संगणमत करुन मातीकाम खोदकाम वगळून गौणखनिज (मुरूम) खोदकाम केले आहे. ते मुरुम तेढा ते पठाणटोला मार्गावरील डांबरीकरण रस्त्यावरचे कठडे भरणकामाकरीता विकल्याचा आरोप वालदे यांनी केला आहे. तलावातील मुरूम खोदकाम करण्याकरीता कालव्याच्या मुख्यव्दारापासून १५ फुट अंतरावर ८ फुट खोल खड्डा करून खोदकाम केले आहे. त्यामुळे कालव्याव्दारे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपसा होणार नाही.त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता,आ.राजकुमार बडोले, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून वालदे यांनी केली आहे. एकीकडे अनेकांनी तलावाच्या जमिनीवर अतिक्र मण केले आहे. तर दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता हे शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाची चौकशी करुन शेतकºयांवरील अन्याय दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मामा तलाव खोलीकरण कामाची माती ग्रामपंचायतने सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी टाकली आहे. येथील मुरुम कोणत्या खडीकरण व बांधकामासाठी किंवा रस्तावरचे कठडे भरण्यासाठी नेण्यात आले याची माहिती आपल्याला नाही. आपल्यावर केलेले आरोप तथ्यहिन आहे.- दिलीप चौरागडेअभियंता लघु पाटबंधारे विभाग गोंदिया