शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

हजेरी सहायकांवर शासनाचा अन्याय

By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST

२० वर्षापासून संघर्षरत हजेरी सहायकांना आताही शासनाकडून न्याय मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशान्वये कामावर तर घेण्यात आले, परंतु त्यांना स्थायी स्वरुपात शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले नाही.

२० वर्षांपासून उपेक्षा : आता पं.स.च्या मग्रारोहयो अंतर्गत कामे करणारकाचेवानी : २० वर्षापासून संघर्षरत हजेरी सहायकांना आताही शासनाकडून न्याय मिळाला नाही. न्यायालयाच्या आदेशान्वये कामावर तर घेण्यात आले, परंतु त्यांना स्थायी स्वरुपात शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले नाही. हजेरी सहायकांचा शासन सेवेत समावेश झाला असला तरी स्थायी न केल्याने शासनाने त्यांची उपेक्षाच केली आहे.रोजगार हमी योजनेवर २६ मे १९९३ ते २९ मे १९९३ या काळात कार्यरत सहायकांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक विभगात रिक्त पदांवर घ्यायचे होते. १९९५ ते २००४ या कालावधीत अनेक हजेरी सहायकांना पात्रतेनुसार शासन सेवेत समाविष्ट करण्यात आले. मात्र रिक्त पद नसल्याचे सांगून राज्यातील ७५९ हजेरी सहायकांना शासन सेवेत समायोजन करण्यात आले नाही. जिल्ह्यातील सेवाजेष्ठता यादीत असणाऱ्या वर्ग ‘ड’ २२ पदांकरिता (२५५०-५५-२६६०-६०-३२००) आणि वर्ग ‘क’ मधील ७२९ पदांकरिता (३०००-७५-३९५०-८०-४५९०) वेतन श्रेणी निश्चित करुन पदे निर्माण करण्याची मान्यता शासन निर्णय (नियोजन विभाग-हसका-१३०१/प्र-१०७ रोहयो-३ दि. २५ जून २००४) अन्वये दिली होती. या आदेशात सदर तारखेपासून हजेरी सहायकांना शासन सेवेत सामावून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सर्व हजेरी सहायकांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू होतील व शासन सेवेत सामावून घेतल्यामुळे त्यांना शासन सेवेविषयक सर्व लाभ देण्यात येतील, असेही स्पष्टीकरण दिले होते. थोडक्यात ते राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून राहतील. हजेरी सहायक ही पदे अधिसंख्य असल्याने त्यांना नियमित हजेरी सहायक म्हणून ठेवता येणार नाही. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात पदे उपलब्ध झाल्यावर त्यांना त्यात समावून घ्यावयाचे सांगितले होते. सद्यस्थितीत राज्यात ७५१ पैकी ३६७ हजेरी सहायक उर्वरित आहेत. त्यांचे वेतन रोहयोच्या निधीतून देण्यात येत आहे.सन २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात सर्व हजेरी सहायक विविध विभागात कार्यरत असले तरी त्यांचे वेतन रोहयो निधीतून दिले जात होते. परंतु सध्या रोहयोच्या कामात हजेरी सहायकांचे लाभ होत नसल्याने पुन्हा एकदा पं.स.च्या मग्रारोहयोकडे वर्ग करण्यात आले आहे. (वार्ताहर)