शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

डिजिटल शाळांमध्ये ‘ दीक्षा उपक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

वर्ग अध्यापनात डिजीटल साधनांचा नियोजनपूर्वक व प्रभावीपणे उपयोग केला गेला तर विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती प्राप्त करण्यात मदत होते. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईलमध्ये दीक्षा अ‍ॅप वापरण्यासाठी आता दीक्षा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदर मंगळवारी राबविणार । २७ आॅगस्टपासून जिल्ह्यात शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा १०० टक्के डिजीटल असून त्या अनुषंगाने डिजीटल साधनांचा वापर विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापनात व्हावा या हेतूने ‘दीक्षा दिवस उपक्रम’ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.सन २०१७-१८ पासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था व प्र.प.पुणे(विद्या प्राधिकरण) यांनी महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या प्रत्येक विषयांच्या पाठ्य घटकांवर ई-साहित्य तयार केले आहे. ते दीक्षा अ‍ॅप व दीक्षा वेबसाईटच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करुन दिले आहे.वर्ग अध्यापनात डिजीटल साधनांचा नियोजनपूर्वक व प्रभावीपणे उपयोग केला गेला तर विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती प्राप्त करण्यात मदत होते. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अ‍ॅँड्रॉईड मोबाईलमध्ये दीक्षा अ‍ॅप वापरण्यासाठी आता दीक्षा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.२७ आॅगस्टपासून दीक्षा दिवस म्हणून आपल्या जिल्ह्यात हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. प्रत्येक मंगळवारी ५ वी तासिका जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील (सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा वगळून) शिक्षकांनी आपापल्या वर्गात नियोजित तासिकेत दीक्षा अ‍ॅप मधील ई-साहित्यांच्या मदतीने वर्ग अध्यापन करुन दीक्षा दिवस साजरा करायचा आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी ‘झूम मिटींग’च्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.भाषा, गणित, विज्ञान सामाजिक शास्त्रावर भरमुख्याध्यापकांनी दीक्षा अ‍ॅपचा वापर करुन शिक्षक अध्यापन करीत आहेत त्यांचे फोटो जपून ठेवायचे आहे. किती शिक्षकांनी दीक्षा अ‍ॅपचा कोणत्या विषयाकरिता व घटकाकरिता वापर केला, येणाऱ्या अडचणी व दीक्षा अ‍ॅपमध्ये करावयाच्या सुधारणा याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे. २७ ऑगस्ट पासून दर मंगळवारी ५ वी तासिकेला नियमित सुरु असावी. पर्यवेक्षकीय अधिकारी जर या दिवशी भेटीवर असतील तर ही तासिका दीक्षा तासिका म्हणून ओळखली जाईल. गरजेनुसार कितीही वेळा दीक्षा अ‍ॅपचा वापर करुन प्राधान्याने भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयाचे मुलांना अध्ययन अनुभव देण्यावर भर द्यावा अशा सूचना आहेत.अशा दिल्या मार्गदर्शन सूचना२७ ऑगस्ट पूर्वी केंद्रातील सर्व शिक्षकांच्या मोबाईलमध्ये दीक्षा अ‍ॅप इंस्टॉल करुन त्यांना ते वापरता येते याची केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, बीआरजी-सीआरजी सदस्य, तंत्रस्नेही शिक्षकांना खात्री करायची आहे. ज्या शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळांतील शिक्षकांनी इंटरनेट सुविधा असणाºया क्षेत्रात २७ ऑगस्ट पूर्वी प्लेस्टोर मधून दीक्षा अ‍ॅप इंस्टॉल करुन घ्यायचे आहे. नियोजित विषय व पाठ्यघटक शिकविणार आहेत तो घटक ऑनलाईन डाऊनलोड करावयाचा आहे. ज्या शाळांमध्ये प्रोजेक्टर, एलईडी-एलसीडी टीव्ही, संगणक इंटरनेटसह असेल अशा शाळांनी मोठ्या स्क्रीनवर दीक्षा अ‍ॅप मधील घटक दाखवण्याची व्यवस्था करावयाची आहे.

टॅग्स :Schoolशाळा