शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून परतणाऱ्यांमुळे वाढतोय जिल्ह्यात संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

तिरोडा तालुक्यातील पाचशेहून अधिक नागरिक रोजगारासाठी आखाती देशात गेले आहेत. मात्र कोरोनाचा संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबदी आहे. त्यामुळे ते आपल्या स्वगृही परतत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीनशेहून अधिक नागरिक विदेशातून परतले आहेत. यापैकी ७० ते ८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यात एकूण आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विदेशातून परतलेलेच आहे.

ठळक मुद्देआणखी सात कोरोनाबाधितांची भर : आठ जण कोरोनामुक्त, कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ६४ वर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची स्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र असताना विदेशातून स्वगृही परतणाºया नागरिकांमुळे कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. मागील आठ दिवसात विदेशातून स्वगृही परतलेल्या २५ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बुधवारी विदेशातून परतलेल्या चार जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह तर तीन स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळले. विदेशातून परतणाऱ्यांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.तिरोडा तालुक्यातील पाचशेहून अधिक नागरिक रोजगारासाठी आखाती देशात गेले आहेत. मात्र कोरोनाचा संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबदी आहे. त्यामुळे ते आपल्या स्वगृही परतत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीनशेहून अधिक नागरिक विदेशातून परतले आहेत. यापैकी ७० ते ८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यात एकूण आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विदेशातून परतलेलेच आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आॅटोक्यात येत असल्याचे चित्र असताना विदेशातून येणाºया नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विशेष म्हणजे २५ जूनपूर्वी जिल्ह्यात स्थानिक कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण हे बोटावर मोजण्या इतके होते. मात्र गोंदिया तालुक्यातील मुंडीपार येथील एका कंपनीत कार्यरत एका वृध्दाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेतले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. बुधवारी आणखी तिरोडा तालुक्यातील चार जणांचे आणि सडक अर्जुनी तालुक्यातील ३ अशा एकूण सात जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.या सर्वांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर आठ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासा दायक बाब आहे. जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या ६४ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत एकूण १९२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १२६ कोरोना बाधित कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.महिनाभरात ३४९४ नमुन्यांची तपासणीयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणीसाठी ८ जूनपासून प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेत महिनाभराच्या कालावधीत एकूण ३४९४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील प्रयोगशाळेत सुरूवातीला १२० स्वॅब नमुने दररोज तपासणीची परवानगी दिली होती. त्यात आता वाढ करण्यात आली असून दररोज १५० स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे.२६२ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४८६७ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १९२ नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर ४६७५ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. २६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या