लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पांढरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात १ ऑक्टोबरला एक नवजात बाळ बेवारस फेकण्यात आले होते. त्या जीवंत बाळावर उपचार करण्यासाठी १०८ या रूग्णवाहीकेला फोन लावण्यात आले.मात्र तब्बल दोन तासानंतर ती रूग्णवाहिका आल्याने उपचाराअभावी त्या अर्भकाचा मृत्यू झाला. नंतर बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्या अर्भकाला मृत घोषीत केले.१ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिवंत असलेले नवजात अर्भक आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात राहणारे उत्तम एकादश कोटांगले (४६) यांनी या अर्भकाची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली.त्या अर्भकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला आरोग्य केंद्र परिसरात सोडून दिले.पोलीस शिपाई टेंभूर्णीकर यांनी १०८ क्रमांकावर फोन करून त्या बाळाला उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले.परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रूग्णवाहीकेला फोन लावल्यानंतर तब्बल दोन तास रुग्णवाहिका उशीरा पोहचली. उशीरा आलेली ती रूग्णवाहीका रस्त्यात बिघडल्याने पुन्हा एक तास तिथे वाया गेला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३१७, ३१८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी केली मातेला अटकनवजात बाळाला जन्म दिल्यानंतर आरोग्य केंद्र परिसरात सोडणाऱ्या त्या मातेला पोलिसांनी अटक केली आहे. ती अविवाहित असून किसनपूर (सितेपार) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्या १८ वर्षाच्या मातेला न्यायालयात हजर केले. न्यालयातून तिला जामीन देण्यात आला.अनैतिक संबधातून ते बाळ जन्माला आले होते.त्यामुळे आरोग्य केंद्र परिसरात त्याला टाकल्याची माहिती देण्यात आली.
रूग्णवाहिका दोन तास उशिरा पोहचल्याने ‘त्या’ अर्भकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST
१ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिवंत असलेले नवजात अर्भक आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात राहणारे उत्तम एकादश कोटांगले (४६) यांनी या अर्भकाची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली.त्या अर्भकाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला आरोग्य केंद्र परिसरात सोडून दिले.
रूग्णवाहिका दोन तास उशिरा पोहचल्याने ‘त्या’ अर्भकाचा मृत्यू
ठळक मुद्देजननी शिशू सुरक्षा योजना अपयशी : १०८ ची सेवा नावापुरतीच