शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या काळात रोजगाराऐवजी बेरोजगारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:05 IST

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे.

ठळक मुद्देगोंदियात तालुक्यात गोपालदास अग्रवाल यांची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे. भाजप सरकारच्या काळात रोजगार मिळण्याऐवजी उलट बेराजगारीत वाढ झाली असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी (दि.४) फुलचूर येथे आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.आरोग्य सभापती विमल नागपूरे, सदस्य विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, माजी सभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रयणी धावडे, योगराज उपराडे, अनित मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे उपस्थित होते. अग्रवाल म्हणाले केंद्रात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास २२ लाख पदे त्वरीत भरण्यात येतील. मोदी सरकारने प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख येण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता केली नाही. तर लगतच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. भाजप सरकारच्या जीएसटी, नोटबंदी सारख्या निर्णयामुळे लघु उद्योजक संकटात आले आहे.त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याची हिच योग्य वेळ आहे. या क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक