शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

डॉक्टरांअभावी आरोग्य केंद्रात वाढल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

असाच प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आहे. दवाखान्यात सतत २५ वर्ष सेवा देणारे डॉक्टर डुंभरे हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून दुसरा डॉक्टर पाठविण्यात आला नाही. तसेच दोन महिन्यां अगोदर याच दवाखान्यात विंचूरकर नावाचे डॉक्टर रुजू झाले होते. मात्र ते दोन महिन्यांतून एक महिनाही सेवा न देता रजेवर गेले व परतलेच नाही.

ठळक मुद्देरिक्त पदांचे ग्रहण : महिला डाक्टरांच्या नियुक्तीची मागणी

वामन लांजेवार।लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : खेड्यापाड्यातील जनतेला आरोग्याची उत्तम सेवा मिळावी या हेतूने शासनस्तरावर ठिकठिकाणी दवाखाने उघडण्यात आले आहेत. मात्र कधी डॉक्टरांची कमतरता तर कधी औषधांचा अभाव यामुळे जनतेला आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळत नाही. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्याची वाट धरावी लागते.असाच प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आहे. दवाखान्यात सतत २५ वर्ष सेवा देणारे डॉक्टर डुंभरे हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून दुसरा डॉक्टर पाठविण्यात आला नाही. तसेच दोन महिन्यां अगोदर याच दवाखान्यात विंचूरकर नावाचे डॉक्टर रुजू झाले होते. मात्र ते दोन महिन्यांतून एक महिनाही सेवा न देता रजेवर गेले व परतलेच नाही. त्यामुळे सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर दोनोडे सेवा देत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व २७ गावांचा समावेश आहे. सदर परिसर आदिवासी बहुल, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने येथे कोणताही डॉक्टर यायला तयार नाही याचे अनेक उदाहरण आहेत. केंद्रात अनेक वर्षांपासून औषध निर्माता, परिचर, एन.एम, क्लर्क व आरोग्य सहायकाचे पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होते. आरोग्य केंद्रात वेळी अवेळी प्रसुतीसाठी महिला येतात. तसेच कुटूंब नियोजनांंतर्गत शस्त्रक्रियेसाठी दूरवरुन महिला मोठ्या प्रमाणात भरती होतात. मात्र त्यांना पुरेशी सेवा उपलब्ध होत नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांची ओरड आहे. सध्या केंद्रात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. रुग्णांचे नातेवाईक पिण्याच्या पाण्यासाठी दारोदारी भटकतांना दिसतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच महिला रुग्णांच्या तपासणीसाठी महिला डॉक्टर नसल्याने नाईलाजाने पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी लागते.प्रशासनाकडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या सभा, सर्व्हेक्षण, शिबिर, कार्यालयीन रेकार्ड व बाह्य रुग्ण सेवेचा कार्यभार एकाच डॉक्टरवर अवलंबून असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळेलच याची शाश्वती नाही. परिणामी ‘रेफर टू गोंदिया’ हा मंत्र राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य