शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर वाढली रेल्वेंची संख्या; हावडा व मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेकडून अजून काही गाड्यांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरून नियमित ७५ गाड्या धावत होत्या, तर दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र लाॅकडाऊनमुळे लोकल, पॅसेजरसह बऱ्याच रेल्वे गाड्या अद्यापही पूर्ववत सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांची प्रतीक्षा कायम आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वत्र आता कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात आला आहे. सर्वच व्यवहार देखील आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वेने सुध्दा रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे प्रमुख स्थानक असून या स्थानकावर दररोज ४७ गाड्या ये-जा करीत असून यातून साडेचार हजारावर प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढण्यास सुरुवात झाली असून हावडा आणि मुंबई या दोन्ही मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेकडून अजून काही गाड्यांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. लॉकडाऊनपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावरून नियमित ७५ गाड्या धावत होत्या, तर दररोज २५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. मात्र लाॅकडाऊनमुळे लोकल, पॅसेजरसह बऱ्याच रेल्वे गाड्या अद्यापही पूर्ववत सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. रेल्वे विभागाने पँसेजर आणि लोकल गाड्या सुरु करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी. 

लोकल व पॅसेजर रुळावर केव्हा रेल्वे विभागाने विशेष तसेच इतरही गाड्यांत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लोकल आणि पॅसेजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लोकल आणि पॅसेजर गाड्या नेमक्या रुळावर केव्हा येणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

प्लॅटफाॅर्म तिकीट विक्री स्थिर 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये केले होते. हे दर अद्यापही कमी केले नसल्याने प्लॅटफाॅर्म तिकीट विक्रीत वाढ झालेली नाही. तिकिटाचे दर वाढविण्यापूर्वी दररोज ४५० हून अधिक प्लॅटफार्म तिकिटांची विक्री केली जात होती. ती आता ७० ते ८० वर आली आहे. 

सुरू असलेल्या रेल्वे गाड्या... - नागपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेस- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस- छत्तीसगड-अमृतसर एक्स्प्रेस- पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस- जबलपूर-चांदाफोर्ट- समता एक्स्प्रेस- अजमेर-पुरी एक्स्प्रेस

शहरांकडे धाव

-  कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर रेल्वे गाड्यांमधील गर्दीत वाढ होऊ लागली आहे. मुंबई आणि हावडा या दोन्ही मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांत सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.-  आता जवळपास सर्वच व्यवहार शिथिल होत असून रोजगारासाठी अनेकजण शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुध्दा रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे