गोंदिया : संगणकीय युगात भारताने घोडदौड सुरू ठेवली असून संगणकानंतर अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध होऊ लागली आहेत. शेतातील पीक काढत असताना त्याचप्रमाणे खोदकाम अथवा कोणतीही कामे यंत्रामार्फत केली जातात. यामुळे मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.भारतात संगणकाने प्रवेश केला. त्या पाठोपाठ विविध यंत्रणा कामाला लागल्याने शासकीय कामातही मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर होऊ लागला आहे. एकीकडे शासन रोजगार हमी योजना सारख्या कामातून यंत्राचा वापर करु लागला आहे. कुठल्याही शहरात शासकीय स्तरावर खोदकाम असो किंवा कोणत्याही बांधकामासाठीचे खोदकाम असो यंत्राद्वारे अगदी कमी वेळात उरकवून घेतले जाते. ज्या ठिकाणी शेकडो मजूर पूर्वी कामाला लावले जात होते, त्या ठिकाणी कमी मजुरांकडून कामे करवून घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही सर्व कामे यंत्रांकडून केली जात आहेत. देशात बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. तसेच यंत्रांच्याही संख्येत वाढ होत आहे. शासकीय कंत्राटदार लाखो रुपये खर्च करून यंत्र खरेदी करीत असतात. सिमेंट, काँक्रेटचे काम करण्यासाठीसुद्धा आता यंत्र उपलब्ध झाले आहे. यामुळे सिमेंट, रेती, गिट्टी यांना एकत्रीत करुन बांधकामही लवकरात लवकर केले जाते.शेतातही ट्रॅक्टरसारख्या यंत्राने मशागत केली जाते. वखर, नागर यासारखी शेतोपयोगी अवजारे आता नेस्तनाबूत झाली आहेत. शेतीला मजूर नाही व सुशिक्षितांना काम नाही अशी स्थिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
बेरोजगारांच्या संख्येत वाढ
By admin | Updated: July 15, 2015 02:20 IST