शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:24 IST

मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोन जणांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला. सालेकसा येथे बुधवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला.यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत तीन जणांचा मृत्यू : रुग्णालयात प्रतिबंधात्मक लसचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोन जणांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला. सालेकसा येथे बुधवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला.यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.बदलत्या वातावरणामुळे साथ रोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी सडक/अर्जुनी तालुक्यातील फुटाळा एका रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी अर्जुनी मोरगाव येथील एका महिलेचा आणि बुधवारी (दि.२०) आमगाव येथील एका तरुणीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील तीन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक-अजुनी, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांमध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील स्वाईन फ्लूची प्रतिबंधकात्मक लस उपलब्ध नसल्याचे बोलल्या जाते. एकीकडे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे कुठल्याच उपाययोजना सुरू न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोष मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.या गोष्टींची घ्या काळजीखोकतांना किंवा शिंकतांना तोंडावर रु माल घ्या. रोगी व्यक्तीने वापरलेले रु माल, टॉवेल, कपडे इत्यादीचा वापर करु नये. साबण व पाण्याचा वापर करु न वारंवार हात धुवावे. सर्दी, खोकला यासारखे लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकल्याचा संसर्ग झाल्यास जास्त लोकांच्या गर्दीत जाणे टाळावे व घरच्या घरी राहण्याचा प्रयत्न करावा.स्वाईन फ्लूची प्रतिबंधात्मक लस बाहेरुन खरेदी करावी लागते.मात्र स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्या सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.- डॉ.रुखमोडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असून प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्यात. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडू.- सहसराम कोरोटे, जिल्हा महासचिव काँग्रेस.