शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

गतवर्षीपेक्षा एसटीच्या दिवाळी उत्पन्नात वाढ

By admin | Updated: November 2, 2014 22:37 IST

राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या कालावधीत गोंदिया आगाराच्या बसेस कमी धावल्या. तर

देवानंद शहारे - गोंदियाराज्य परिवहन महामंडळाने दिवाळीनिमित्त प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून काही विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दिवाळीच्या कालावधीत गोंदिया आगाराच्या बसेस कमी धावल्या. तर तिरोडा आगाराच्या बसेसचा भारमान कमी होता. असे असतानाही या दोन्ही आगारांचे दिवाळी काळातील उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याची माहिती आहे. मागील वर्षभरापूर्वी झालेल्या उत्पन्नावर नजर टाकली तर यावर्षी गोंदिया आगाराला १२ लाख ७९ हजार १५२ रूपये अधिक उत्पन्न झाले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढते. अनेक प्रवाशी आपला प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने करतात. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी व पाच दिवसांनंतर बसेसमध्ये गर्दी दिसून येते. मागील वर्षी २६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१३ दरम्यान गोंदिया आगारातून झालेल्या तिकिटांच्या विक्रीतून ९२ लाख १२ हजार ७०९ रूपये मिळाले होते. तर सन २०१४ मध्ये १६ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत एक कोटी चार लाख ९१ हजार ८६१ रूपयांचे उत्पन्न झाले. त्यामुळे गोंदिया आगाराला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १२ लाख ७९ हजार १५२ रूपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले. तसेच दिवाळीच्या नंतरचे १० दिवसही आता पूर्ण झालेले नाहीत. शिवाय मागील वर्षाच्या तुलनेत बसांनी यंदा कमी प्रवास केला. मागील वर्षी २६ आॅक्टोबरपासून १० दिवसांपर्यंत ४० लाख ४० हजार ८४६ किमीचा प्रवास गोंदिया आगाराच्या बसांनी केला. तर यावर्षी १६ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत तीन लाख ५९ हजार १९७ किमीचा प्रवास केला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोंदिया आगाराच्या बसेस ८१ हजार ६४९ किमी कमी धावल्या.तसेच तिरोडा आगारातील बसेसमध्ये गर्दीचे भारमान गतवर्षीपेक्षा यंदा कमी असतानाही मागील दिवाळीपेक्षा या दिवाळीत अधिकचे उत्पन्न मिळाले. हे भारमान मागील वर्षापेक्षा ३.२१ टक्क्यांनी कमी होते.यंदाची दिवाळी २३ आॅक्टोबर रोजी होती. तर मागील वर्षी दिवाळी ३ नोव्हेंबरची होती. यंदाच्या दिवाळीमध्ये तिरोडा आगाराच्या बसेसने २१ ते ३१ आॅक्टोबर २०१४ च्या कालावधीत ३९ लाख ६७ हजार २१६ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तर याच कालावधीत मागील वर्षी म्हणजे २१ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत २४ लाख ६६ हजार २८४ रूपयांचे उत्पन्न तिरोडा आगाराला मिळाले होते. तर मागील वर्षीच्या दिवाळीच्या १० दिवसात म्हणजे १ ते १० नोव्हेंबर २०१३ च्या कालावधीत २९ लाख ६२ हजार २४९ रूपये उत्पन्न मिळाले होते. म्हणजे तिरोडा आगाराला गतवर्षीपेक्षा दिवाळी सणात यंदा उत्पन्न तब्बल १० लाख चार हजार ९६७ रूपये अधिक झाले. सन २०१३ च्या दिवाळीच्या नोव्हेंबर महिन्यात तिरोडा आगाराच्या बसेस एकूण तीन लाख ७४ हजार २९० किमी धावल्या व त्यातून एकूण ९२ लाख ७१ हजार १६५ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तर यंदा सन २०१४ च्या दिवाळीच्या आॅक्टोबर महिन्यात तिरोडा आगाराच्या बसेस तीन लाख ९२ हजार ६४८ किमी धावल्या. त्यातून तिरोडा आगाराला एकूण ९७ लाख ७० हजार ०११ रूपयांचे उत्पन्न मिळाले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या महिन्यात तिरोडा आगाराने तब्बल चार लाख ९८ हजार ८४६ रूपयांची अधिकची कमाई केली.